Porn Video In Assembly : विधानसभेत पॉर्न बघत होता भाजप आमदार; Video सोशल मीडियावर व्हायरल

Tripura BJP MLA Jadab Lal Nath allegedly caught watching porn during the state Assembly session watch viral video
Tripura BJP MLA Jadab Lal Nath allegedly caught watching porn during the state Assembly session watch viral video
Updated on

त्रिपुरामध्ये विधानसभेच्या निवडणूका जिंकत भाजपने सत्ता पुन्हा काबीज केली आहे. सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपच्या एका आमदाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भाजप आमदार विधानसभेच्या अधिवेशन सत्रादरम्यान सभागृहात बसून मोबाईलवर पॉर्न पाहाताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ त्रिपुरा विधानसभेतील आज (३० मार्च) चाच असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये त्रिपुरा बागबासा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार जादब लाल नाथ दिसत आहेत. ते सभागृहातील त्यांच्या सीटवर बसून मोबाईलवरती व्हिडीओ पाहाताना दिसत आहेत.

Tripura BJP MLA Jadab Lal Nath allegedly caught watching porn during the state Assembly session watch viral video
Nanded Accident News : कामावर निघालेल्या मजूरांनी भरलेल्या रिक्षाला ट्रकनं उडवलं! ५ जण ठार, ६ गंभीर जखमी

दरम्यान हे आमदार मोबाईलवर व्हिडीओ पाहताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यानंतर आता जादब लाल नाथ यांच्यावर विधानसभेच्या कामकाजादरम्यान सभागृहात पॉर्न व्हिडीओ पाहिल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आज तकने याबद्दलचे वृत्त दिलं आहे. तसेच फॅक्ट चेकर मोहम्मद जुबैर यांनी देखील हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

Tripura BJP MLA Jadab Lal Nath allegedly caught watching porn during the state Assembly session watch viral video
Mumbai News : हेट स्पीच प्रकरणात भाजपच्या निलंबित आमदाराच्या अडचणीत वाढ; FIR दाखल

जादब लाल नाथ यांनी कम्युनीस्ट पक्ष सीपीएमचा सर्वात मजबूत किल्ला मानल्या जाणाऱ्या बागबासा विधानसभा मतदारसंघात भाजपला विजय मिळवून दिला होता. बागबासा विधानसभा जागेवर २०१८ मध्ये देखील भाजपला विजय मिळवता आला नव्हता.

जादब लाल नाथ यांनी सीपीएमचे नेते बिजिता नाथ यांचा १४०० पेक्षा अधिक मतांच्या फरकाने पराभव केला होता. तृणमूल काँग्रेस चे बिमल नाथ तीसर्या आणि टिपरा मोथा पक्षाच्या कल्पना सिन्हा चौथ्या क्रमांकावर राहिल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com