त्रिपुरा हिंसाचार; 36 आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याचे सायबर पोलिसांचे निर्देश | Tripura violence update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cyber police

त्रिपुरा हिंसाचार; 36 आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याचे सायबर पोलिसांचे निर्देश

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : त्रिपुरा हिसांचार (Tripura violence) संदर्भातील सोशल मीडियावरच्या (social media) फिरणाऱ्या 36 आक्षेपार्ह पोस्ट (Offensive post) काढून टाकण्याचे निर्देश महाराष्ट्र सायबर पोलिसांनी (cyber police) दिले आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यातील संवेदनशील परिस्थिती बघता या पोस्टमुळे सामाजिक सौदार्ह्याला बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पोस्ट तातडीने काढून टाकण्याच्या सूचना (Post removing notice) सोशल मीडिया कंपनीना देण्यात आल्या आहेत. ती प्रक्रीया सुरु असल्याची माहितीही सायबर पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा: कल्याण : मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक

गेल्या आठवड्यात राज्यात अमरावती, नांदेड, मालेगाव, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात त्रिपुरातील हिसांचाराचा निषेध करण्यासाठी काही संघटनांनी मोर्चे काढले होते. या मोर्चानंतर दोन समुदायामध्ये तणाव निर्माण झाला होता. सायबर पोलिसांनी जवळपास 36 अशा पोस्ट शोधून काढल्या आहेत.

यातील 25 पोस्ट ट्विटवर, सहा फेसबुकवर तर पाच इंस्टाग्रामवर आहेत. त्या 12 ते 15 नोव्हेबंर दरम्यान पोस्ट केल्या आहेत.अस सायबर पोलिसांनी सांगीतले आहे. या पोस्ट वायर झाल्यात तर अजून तणाव भडकू शकतो. त्यामुऴे या पोस्ट डिलीट करण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आलेत, यातील काही पोस्ट डिलीट केल्या असून उर्वरीत लवकरचं काढून टाकण्यात येणार असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.

loading image
go to top