महिला पोलिस ओरडत राहिली; मात्र, लोक तिला मारतच होते

वृत्तसंस्था
रविवार, 30 जून 2019

तेलंगणातल्या आसिफाबाद जिल्ह्यातील सिरपूर कागज नगर येथील व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक महिला पोलिस कर्मचाऱी ट्रॅक्टरवर उभे राहत संतप्त लोकांपासून वाचण्याचा प्रयत्न करीत असून लोक तिला काठ्यांनी मारहाण करीत आहेत.

असिफाबाद : तेलंगणातल्या आसिफाबाद जिल्ह्यातील सिरपूर कागज नगर येथील व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक महिला पोलिस कर्मचाऱी ट्रॅक्टरवर उभे राहत संतप्त लोकांपासून वाचण्याचा प्रयत्न करीत असून लोक तिला काठ्यांनी मारहाण करीत आहेत. मोकळ्या जागेवर वृक्षारोपणासाठी आलेल्या पोलिसांवर आणि वन कर्मचाऱ्यांवर ग्रामस्थांनी अचानक हल्ला चढवला होता.

पोलिस आणि वन कर्मचारी जेव्हा वृक्षारोपणासाठी सिरपूर कागजनगर येथे पोहोचले तेव्हा तेलंगाणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला. यावेळी या कार्यकर्त्यांनी पोलिसांसह वन कर्मचाऱ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचा अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पोहचल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली.

दरम्यान, हा हल्ला इतका जोरदार होता की, पोलिसांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. यांपैकी एक महिला पोलिस कर्मचारी झुंडीपासून वाचण्यासाठी एका ट्रॅक्टरवर चढून ओरडत राहिली मात्र, लोक तिला मारतच होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TRS workers rain blows on woman forest ranger in Telangana