Truck Overturns After Sudden Turn By Bolero
Esakal
देश
भुस्सा भरलेला ट्रक उलटल्यानं बोलेरोचा चुराडा, चालकाच्या डोक्याचा चेंदामेंदा; अपघाताचा VIDEO आला समोर
Truck Bolero Accident Video: बोलेरोनं अचानक टर्न मारल्यानं मागून येणारा ट्रक उलटला. यात बोलेरोचा चुराडा झाला असून चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Accident Viral Video: उत्तर प्रदेशात लाकडाचा भुसा भरलेला ट्रक बोलेरोवर उलटल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात बोलेरोचा चुराडा झाला असून चालकाचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. तर शरीर पूर्ण दबलं होतं. अपघाताचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

