ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओचा चुराडा, चौघांचा मृत्यू; एक जण ३० फूट उडून रस्त्यावर पडला, दोघे गंभीर जखमी

Scorpio Wrecked in Truck Collision: स्कॉर्पिओला ट्रकने मागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. प्रयागराज वाराणसी महामार्गावर हा अपघात झाला.
Scorpio Accident

Scorpio Wrecked in Truck Collision

Esakal

Updated on: 

Scorpio Accident: ट्रकने स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत चौघांचा मृत्यू झाला आहे. प्रयागराज वाराणसी राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे हा अपघात झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मिर्जामुराद इथल्या रूपापूर गावाजवळ ओव्हरब्रीजवर हा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओचा चुराडा झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. रक्तही मोठ्या प्रमाणात सांडलं होतं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com