Trupti Desai
Trupti DesaiTeam eSakal

हे सरकार जनतेचं की, दारुड्यांचं? तृप्ती देसाई संतापल्या

दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले - तृप्ती देसाई
Published on

राज्यात लवकरच किराण दुकानांमध्ये किराणा मालाप्रमाणे वाईन देखील मिळणार आहे. राज्य सरकारने हा निर्णय (Wine in Supermarkets) घेतला असून, त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. तर दुसरीकडे सरकारने घेतलेल्या या निर्णयावर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. त्यातच आता तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी देखील सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. हे सरकार जनतेचं आहे की, दारुड्याचं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Trupti Desai
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन्सचा निर्णय; गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील
Trupti Desai
दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार ? राज्य शिक्षण मंडळाने दिला प्रस्ताव

राज्याला मद्यराष्ट्र करण्याकडे वाटचाल, हे सरकार जनतेचे आहे की, दारुड्यांचे या सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली आणि आता सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार असं म्हणत तृप्ती देसाई यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. या सरकारला तरुणांचे भविष्य घडवायचे आहे की अंधारात ठेवायचे आहे. दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेक तरूण गैरमार्गाला लागले आहेत ,गुन्हे वाढत आहेत त्यात असा निर्णय घेणे पूर्णपणे चुकीचे आहे असंही त्या म्हणाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com