
सिंह हा जंगलचा राजा असून, त्याच्या वाट्याला कोणी जात नाही. पण, एका म्हैस धाडसाने सिंहासमोर गेली आणि त्याला शिंगावर घेऊन खाली आपटले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली : सिंह हा जंगलचा राजा असून, त्याच्या वाट्याला कोणी जात नाही. पण, एका म्हैस धाडसाने सिंहासमोर गेली आणि त्याला शिंगावर घेऊन खाली आपटले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तिसरा विवाह करून आल्याचे पत्नीने पाहिले अन्...
आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. सुशांत नंदा हे नेहमीच वन्य प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करतात. त्यांच्या व्हिडिओंना नेटिझन्सची मोठी पसंती मिळते. सुशांत नंदा यांनी व्हिडिओ शेअर करताना शीर्षकामध्ये लिहीले आहे की, 'सिंह हा मानवाच्या दृष्टीने जंगलाचा राजा असला तरी ही म्हैस या सिंहला राजा म्हणून माफ करणार नाही.'
महिला पोलिस शिपायाची काढली छेड अन्...
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सिंह शिकारीच्या शोधात होता. यावेळी त्याने म्हशीवर हल्ला केला. पण, शिकार करताना सिंह जखमी झाला. यासंधीचा फायदा घेत म्हशीने सिंहाला डोक्यावर घेऊन खाली आपटले आणी आपला जीव वाचवला. शिकार करतानाचे असे फार दुर्मिळ क्षण असतात. कारण, सिंहाच्या तावडीतून सहसा कोणी सुटत नाही. पण, एका म्हशीने आपली सुटका केली आहे.
Lion is perceived as king of the Jungle by the humans...
But this buffalo doesn’t give a damn to who the king is☺️ pic.twitter.com/20V1fw2ze9— Susanta Nanda IFS (@susantananda3) May 31, 2020