esakal | तुघलकी लॉकडाऊन हेच कोरोनाविरोधी धोरण; राहुल गांधी यांची केंद्रावर टीकेची झोड
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Numbers

तुघलकी लॉकडाऊन हेच कोरोनाविरोधी धोरण; राहुल गांधी यांची केंद्रावर टीकेची झोड

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पहिली पायरी तुघलकी लॉकडाऊन, दुसरी पायरी घंटी वाजवा आणि तिसरी पायरी म्हणजे देवाची प्रार्थना, हेच केंद्र सरकारचे कोरोनाविरोधातील धोरण आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे आज बरसले.

देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे त्यांनी आज ट्विटद्वारे लक्ष केले. कोरोनाला रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याची टीका गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते करीत आहेत. राहुल यांनी कालही टीकात्मक ट्विट केले होते. ‘ना टेस्ट केल्या जात, ना रुग्णालयात बेड आहे, वा व्हेंटिलेटर आहेत. ऑक्सिजनही नाही आणि लसही नाही. फक्त लसीकरण महोत्सवाचे ढोंग आहे,’ अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली होती.

हेही वाचा: ''खरंच काळजी असेल तर''; पुनावालांची बायडेन यांना हात जोडून विनंती

विधानसभा निवडणुकांच्या प्रचारातही काँग्रेस मोदी सरकारवर टीका करीत आहे. त्यात खास करून कोरोनाच्या परिस्थितीचा दाखला देऊन टीका केली जात आहे. पश्‍चिम बंगालमध्ये एका सभेत राहुल यांनी, हे मोदी सरकार नाही, तर दोन-तीन उद्योगपतींचे सरकार आहे, असे म्हटले होते. भारतात लसीचा तुटवडा असल्याचे कारण देत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका वद्रा आणि राहुल यांनी लस निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

प्रत्येकाचे प्रियजन, परिवारातील व्यक्तींना कोरोनचा संसर्ग होतो आहे. त्यामुळे कोरोना संबंधी सुरक्षेची सर्व काळजी घ्या, मास्क लावा. आपल्या सर्वांना मिळून कोरोनाविरोधातील लढ्यात जिंकावे लागेल.

- प्रियांका वद्रा