गुन्हेगाराच्या शोधासाठी श्वान धावले 12 किमी अन्...

वृत्तसंस्था
Tuesday, 21 July 2020

एका खुनाच्या प्रकरणातील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे श्वान तब्बल 12 किलोमीटर धावले. श्वान घराजवळ गेल्यानंतर वास घेत गुन्हेगाराला पकडून दिले आहे. स्निफर डॉग असून, कर्नाटक पोलिस दलातील श्वानाचे विशेष कौतुक होत आहे.

बंगळूर: एका खुनाच्या प्रकरणातील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे श्वान तब्बल 12 किलोमीटर धावले. श्वान घराजवळ गेल्यानंतर वास घेत गुन्हेगाराला पकडून दिले आहे. स्निफर डॉग असून, कर्नाटक पोलिस दलातील श्वानाचे विशेष कौतुक होत आहे.

कर्नाटकच्या दवेंगेरे जिल्ह्यातील ही घटना आहे. पैशांवरून दोघांमध्ये पैशावरून वाद झाला होता. यानंतर चेतन नावाच्या व्यक्तीने चंद्रा नायकवर गोळी झाडली. विशेष म्हणजे ज्या बंदुकीने गोळी चालविण्यात आली, ती बंदूकीची पोलिस स्टेशनमधून चोरी केली होती. चेतनच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल होते.

Video: पत्रकारावर मुलीसमोरच झाडल्या गोळ्या...

पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर 10 वर्षीय तुंगा नावाच्या श्वानाची मदत घेतली. चेतन शेवटच्या वेळी जेथे होता, पोलिस तेथे तुंगाला घेऊन गेले. तेथून वास घेत घेत तुंगा 12 किमी धावली व दोन तासानंतर एका घरासमोर जाऊन थांबली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल्यावर, चेतन त्याच घरात आढळला. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबूल केला. त्याने हुबली पोलिस स्टेशनमधून बंदूक चोरी केल्याचे देखील मान्य केले. तुंगामुळे या गुन्हेगाराला पकडणे शक्य झाले. या विशेष कामगिरीसाठी पोलिस विभागाने तिचा सन्मान देखील केले. तुंगाने यापूर्वीही 50 खून आणि 60 चोरीची प्रकरणात मोलाची मदत केली आहे.

आईच्या पार्थिवाला खांदा देणाऱ्या पाचही मुलांचा मृत्यू...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tunga sniffs out killer after 12km run in 2 hours at karnataka