Air Indiaचे CEO पद नाकारणाऱ्या इल्कर आयसींवर पाक कनेक्शनचे आरोप

Ilker Ayci
Ilker Ayci
Summary

इल्कर आयसी हे १ एप्रिल २०२२ रोजी एअर इंडियाचे CEO म्हणून पदभार स्वीकारणार होते. मात्र त्यांच्या नियुक्तीच्या घोषणेनंतर वाद सुरु झाला.

तुर्कीचे नागरिक असलेल्या इल्कर आयसी यांनी एअर इंडियाच्या सीईओचा पदभार स्वीकारण्यास नकार दिला असल्याचं समजते. टाटा सन्सने १४ फेब्रुवारीला तुर्की एअरलाइन्सचे माजी प्रमुख असलेल्या इल्कर आय़सी यांना एअर इंडियाचे सीईओ म्हणून नियुक्त करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर दोन आठवड्यातच इल्कर आयसी यांनी टाटाचा प्रस्ताव नाकारला आहे. त्यांचे पाकिस्तान कनेक्शनमुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वदेशी जागरण मंचाने गेल्या शुक्रवारी म्हटलं होतं.

इल्कर आयसी आणि तुर्कीचे राष्ट्रपती रसेप तईप एर्दोगन यांचे जवळचे संबंध आहेत. तर एर्दोगन यांचे पाकिस्तानशी खास नाते आहे. अनेकदा एर्दोगन यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीर प्रश्न उचलून धरला आहे. त्यामुळेच इल्कर आयसी यांच्या नियुक्तीला काहींनी विरोध केला होता.

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, तुर्कीच्या इल्कर आयसी यांनी एअर इंडियाचे सीईओ म्हणून नियुक्त करण्याबाबत परवानगीसाठी टाटा सन्सने सरकारकडे अर्ज पाठला आहे आणि याला औपचारिक मंजुरी मागितली आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब केवळ औपचारीक नाही, सरकार याची सखोल चौकशी करेल असं सूत्रांनी सांगितलं आहे.

Ilker Ayci
...तर कोणताही देश सुरक्षित राहणार नाही; युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा

इल्कर आयसी यांच्या नकारानंतर आता टाटा सन्सनला इतर कोणाची नियुक्ती करायीच असा प्रश्न आहे. अद्याप यावर टाटा सन्सकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही. तर इल्कर आयसी यांनी म्हटलं की, आपल्या नियुक्तीला चुकीच्या पद्धतीने रंगवण्यात आलं आहे. त्यामुळेच आपण प्रस्ताव नाकारण्याचा निर्णय़ घेतल्याचं ते म्हणाले.

इल्कर आयसी हे १ एप्रिल २०२२ रोजी त्यांचा पदभार स्वीकारणार होते. मात्र त्यांच्या नियुक्तीच्या घोषणेनंतर वाद सुरु झाला. इल्कर आयसी यांचे तुर्की राष्ट्रपतींसोबत निकटचे संबंध आणि राष्ट्रपतींचे पाकिस्तानशी असलेल्या संबंधांमुळे अनेक आरोप झाल्यानं हे प्रकरण संवेदनशील बनले होते.

Ilker Ayci
खार्किवमध्ये नवीनचा मृत्यू : युक्रेन, रशियाच्या राजदूतांना समन्स

एक तुर्की नागरिक असलेले इल्कर आयसी हे तुर्कीचे राष्ट्रपती रसेप तईप एर्दोगन यांचे सल्लागार होते. तर १९९४ ते १९९८ या काळात इस्तांबुलचे महापौरही होते. २०१५ ते २०२२ पर्यंत ते टर्किश एअरलाइन्सचे अध्यक्ष होते, या काळात एअरलाइन बदलाचे श्रेय इल्कर यांनाच जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com