
अहमदाबाद विमान दुर्घटनेत २७४ जणांचा मृत्यू झाला. यात विमानातील प्रवाशी आणि क्रू मेंबर्ससह २४१ जणांचा समावेश आहे. तर ३३ जण विमान ज्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झालं त्या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी आणि डॉक्टर आहेत. दरम्यान, या विमान दुर्घटनेमागं षडयंत्र असल्याची शंका योगगुरु बाबा रामदेव यांनी व्यक्त केली होती. विमानाच्या मेंटेनन्सचं काम करणाऱ्या तुर्कितील कंपनीवर रामदेव बाबा यांनी संशय व्यक्त केला होता. आता तुर्किच्या कंपनीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.