जन्म-मृत्यू एकत्रच; जुळ्या भावांचं कोरोनामुळे निधन

जन्म-मृत्यू एकत्रच; जुळ्या भावांचं कोरोनामुळे निधन

Twins Die Due to Coronavirus : उत्तर प्रदेशमधील मेरठ (Meerut Corona) मधून एक ह्‌द्‌यद्रावक घटना समोर आली आहे. एकाच दिवशी जन्मलेल्या जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. येथील ग्रेगरी रेमंड राफेल यांनी कोरोनामुळे आपल्या जुडवा मुलांना (Twins Die Due to Corona) एकत्र गमावलं आहे. दोघांचा एकत्रच जन्म झाला आणि मृत्यूही एकत्रच आला. 24 व्या वाढदिवसाला जुळ्या भावांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर दोघांचाही मृत्यू झाला.

जोफ्रेड वर्गीज ग्रेगरी आणि राल्फ्रेड जॉर्ज ग्रेगरी अशी जुळ्या भावांची नावं आहेत. 23 एप्रिल 1997 रोजी सोजा आणि राफेल या दाम्पत्याच्या पोटी जोफ्रेड आणि राल्फ्रेड या जुळ्या मुलांचा जन्म झाला. जुळी बाळं अगदीच सारखी दिसत असल्याचं राफेल यांना अजूनही आठवतं. जोफ्रेड आणि राल्फ्रेड या दोघांनी आयुष्यात सगळ्याच गोष्टी एकत्र केल्या. दोघांचा जन्म एकत्र झाला. इजिनिअरिंगचं शिक्षणही एकत्र गेतलं. तसेच हैदराबाद येथील एका कंपनीमध्ये (Both Working in Hyderabad) एकत्र जॉबही करत होते. त्यांच्या वडिलांनी सांगितलं की, 24 एप्रिल रोजी मुलांना ताप आला होता. दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. दोघांची तब्येत खराब झाल्यामुले रुग्णालयात हलवलं. मात्र, 13 मे आणि 14 मे रोजी एकामागून एक जगाचा निरोप घेतला. दोघांच्या जाण्यानं परिसरात शोककळाचं वातावरण आहे.

जन्म-मृत्यू एकत्रच; जुळ्या भावांचं कोरोनामुळे निधन
जियेंगे तो साथ, मरेंगे तो भी साथ; चुलता पुतणीसोबत सैराट

मेरठमधील कँटॉनमेंटमध्ये हे कुटुंब राहतं. 23 एप्रिल रोजी दोन्ही भावांनी दणक्यात वाढदिवस साजरा केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघांनाही ताप आला. चाचण्या केल्यानंतर कोरोना संसर्ग झाल्याचं समजलं. सुरुवातीला दोघांवर घरीच प्रथमोउपचार करण्यात आले. मात्र दोघांचाही ताप उतरला नाही. त्यांच ऑक्सिजन लेव्हल 90 वर घसरली होती. डॉक्टरांनी दोघांनाही रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. 1 मे रोजी दोघांना रुग्णालयात दाखल केलं. दोघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, अचानक पुन्हा ऑक्सिजन घसरला. प्रकृती खालावली अन् दोघांनी एकापाठोपाठ निरोप घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com