'ट्विटर'च्या खास सेवांसाठी आता मोजावे लागणार पैसे

लवकरच लॉन्च करणार नवी सेवा
Twitter
TwitterSakal

नवी दिल्ली : मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट असलेल्या ट्विटरचा (Micro blogging website twitter) सध्या मोफत वापर केला जातोय. पण लवकरच ट्विटर आपल्या काही सेवांसाठी सबस्क्रिप्शन (subscription) सुरु करणार आहे. त्यामुळे युजर्सना या सेवांसाठी महिन्याला पैसे मोजावे लागणार आहेत. "ट्विटर ब्लू' (Twitter blue) नावाची नवी सेवा ट्विटर लवकरच लॉन्च करणार आहे. (Twitter can no longer be used for free Pay for special services)

Twitter
अटी मान्य न केल्यास whatsapp होणार डिलीट

काही दिवसांपूर्वी ट्विटरने पेड सबस्क्रिप्शन मॉडेल सादर करणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, शनिवारी अॅप संशोधक Jane Manchun Wong यांनी ट्विटरचं हे पेड सबस्क्रिप्शन मॉडेल 'ट्विटर ब्लू' नावानं सादर केलं आहे. त्याचबरोबर बुकमार्क कलेक्शन फिचरचीही घोषणा केली आहे. भारतात यासाठी २०० रुपये प्रतिमहिना शुल्क आकारलं जाऊ शकतं. पण 'ट्विटर ब्लू' ला सर्वात आधी अमेरिकेत लॉन्च करण्यात येणार आहे. यानंतर याला इतर देशांमध्ये लॉन्च केलं जाणार आहे.

'ट्विटर ब्लू'मध्ये काय असणार खास?

द व्हर्जच्या वृत्तानुसार, 'ट्विटर ब्लू' हे अनेक फिचर्सचं एक कलेक्शन आहे. हे फिचर ट्विटरच्या फ्री व्हर्जनमध्ये उपलब्ध असणार नाही. यामध्ये ट्विटला एडिट करण्याचाही पर्याय असेल. याची बऱ्याच दिवसांपासून मागणी होत होती. म्हणजेच युजर्सजवळ कोणत्याही ट्विटला पब्लिशनंतर ५ ते ३० सेकंदात एडिट करण्याचा पर्याय असेल. तसेच "ट्विटर ब्लू' फीचरमध्ये युजर्सजवळ ट्विट सेव्ह करण्याचा पर्याय असेल. यामुळे युजरला ते नंतर सहज शोधता येईल. म्हणजेच ट्विटर तुम्हाला आपलं ट्विट गोळ्या करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देणार आहे.

'या' सेवांचा मिळणार फायदा

ट्विटर सध्या इतर अनेक पर्यायांवर काम करत आहे. ज्याअंतर्गत युजरला फोटो क्रॉपिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच फोटोला पूर्ण डिस्प्ले व्ह्यूचा पर्याय दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर कन्टेंट क्रिएटर जसं की पत्रकार, तज्ज्ञ, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनला देणगी देण्याची सुविधाही उपलब्ध असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com