‘गोल्डन पॅराशूट’मुळे मिळणार १२ कोटी डॉलर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Twitter Elon Musk golden parachute Agreement

‘गोल्डन पॅराशूट’मुळे मिळणार १२ कोटी डॉलर

नवी दिल्ली : ‘ट्विटर’ खरेदी केल्यानंतर उद्योगपती एलॉन मस्क यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून पराग अग्रवाल यांना आणि इतरही वरिष्ठ अधि६काऱ्यांना कार्यमुक्त केले असले तरी कंपनीबरोबर झालेल्या करारामुळे या अधिकाऱ्यांना एकूण १२ कोटी २० लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे.

‘गोल्डन पॅराशूट’ या नावाने ओळखला जाणाऱ्या या करारानुसार, कंपनी दुसऱ्या कंपनीत विलीन झाल्याने किंवा तिची मालकी दुसऱ्या व्यक्तीकडे गेल्याने, वरिष्ठ अधिकाऱ्यांची नोकरी गेल्यास त्यांना पुरेसे आर्थिक लाभ मिळतात. सध्याच्या स्थितीनुसार, अग्रवाल यांना ५.७४ कोटी डॉलर, तर वरिष्ठ अधिकारी विजया गद्दे यांना दोन कोटी डॉलर मिळू शकतात.

तर आम्ही पैसा छापू

ट्रम्प यांचे ट्विटरवर पुनरागमन होण्याबाबत मस्क यांच्याकडे अनेक जण विचारणा करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना मस्क यांनी, ‘ट्रम्प यांच्याबाबतच्या प्रत्येक चौकशीसाठी आम्हाला एक डॉलर मिळाला असता, तर आम्ही प्रचंड प्रमाणात पैसा ‘छापला’ असता,’ अशी मिश्‍किल टिप्पणी केली.

फडणवीसांचीही प्रतिक्रिया

मस्क यांच्या टिप्पणीचा धागा पकडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांवर निशाणा साधला. ‘‘माझ्याबाबत आणि भाजपबाबत विरोधकांनी पसरविलेल्या प्रत्येक फेकन्यूजबाबत एक रुपया मिळाला असता, तर भाजपनेही प्रचंड पैसा छापला असता,’’ असा टोमणा त्यांनी विरोधकांना मारला.