..पण 'ट्विटर राजा'ने ट्विट नाही केले: लालूप्रसाद

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

पाटना (बिहार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "ट्विटर राजा' असे संबोधत नोटाबंदीच्या निर्णयामुळे निधन झालेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली नसल्याची टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केली आहे.

आज (गुरुवार) लालूप्रसाद यांनी ट्विटरद्वारे मोदींवर निशाणा साधला आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात 105 जण मृत्युमुखी पडल्याचे सांगत प्रत्यक्ष मोदींचे नाव न घेता त्यांनी म्हटले आहे की, "देशात 105 लोक मृत्युमुखी पडले आहेत. मात्र "ट्विटर राजा'ने एकही ट्विट केले नाही. मान्य आहे की तुमची चूक झाली पण तुम्ही मृतात्म्यांना श्रद्धांजली तरी वाहायला हवी ना.'

बुधवारी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केल्यानंतर लालूप्रसाद यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. "राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये पुराव्यासह पंतप्रधानांवर 40 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप ठेवला आहे. ही काही किरकोळ गोष्ट नाही. फकीर काहीही लपवत नाहीत. ते पारदर्शक जीवन जगतात. फकीर साहेब 40 कोटी रुपयांचा हिशोब द्या. नसता फकीर आणि फकीरीवरील लोकांचा विश्‍वास उडून जाईल. तथाकथित प्रामाणिक पंतप्रधानांवर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप लावले आहेत आणि ते गप्प आहेत. परदेशात भारताची प्रतिमा खराब होत आहे', अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ...But 'twitter raja' not twitted : Laluprasad