Ayodhya Verdict : नेटकरी अभिमानाने म्हणतायत 'या ऐतिहासिक क्षणाचे आम्ही साक्षीदार!'

टीम ईसकाळ
Saturday, 9 November 2019

सोशल मीडियावर सरकारने बंधन घातली असली तरी ट्विटरवर हॅशटॅग आणि ट्रेंडिंगचा धुमाकूळ आहे. 

नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त जागेत राम मंदिर उभारण्याचा मार्ग आज सुप्रिम कोर्टाच्या निकालानंतर मोकळा झाला. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणात वादग्रस्त 2.77 एकर जागेचे त्रिभाजन करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय चुकीचा असल्याचे सांगत, ही सर्व जागा रामलल्ला पक्षकारांकडे देण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. सोशल मीडियावर सरकारने बंधन घातली असली तरी ट्विटरवर हॅशटॅग आणि ट्रेंडिंगचा धुमाकूळ आहे. 

आता तरी राजकारणासाठी रामाचा वापर थांबेल : काँग्रेस

व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर निर्बंध घालण्यात आले असून ग्रुप्स व पेजेस ब्लॉक करण्यात येत होती. तसेच कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट दिसल्यास लगेच त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. पण या सगळ्यात ट्विटरवर जोरदार चर्चा सुरू आहे. #AYODHYAVERDICT #RamMandir #AyodhyaJudgment #JaiShriRam #BabriMasjid असे अनेक हॅशटॅग ट्रेंडिंग आहेत. या हॅशटॅगने अनेक ट्विट केले बघायला मिळतात.

 

 

न्यायालयात बाजू मांडत होता रामाचा नेक्स्ट फ्रेंड 

आता राम मंदिर उभे करण्यासाठी ट्रस्ट स्थापन करावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या गोष्टीची अंमलबजावणी कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ट्विट्सलाही प्रचंड ओघ आहे.  

आज बाळासाहेब असते तर, राज ठाकरेंना झाली आठवण 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twitter reactions on Ayodhya Verdict on social media