Ayodhya Verdict : राजकारणासाठी श्रीरामाचा वापर आतातरी थांबेल : काँग्रेस

वृत्तसंस्था
Saturday, 9 November 2019

देशात शांततेचे सलोख्याचे वातावरण राहावे. काँग्रेस राम मंदिर बनविण्याच्या बाजूने आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. देशात शांतीचे वातावरण कायम ठेवावे. श्रीराम हे त्यागाचे प्रतिक आहेत, ते सर्वधर्म समभाव, प्रेम आहे. भेदभावासाठी कधी याचा वापर होऊच शकत नाही.

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने राममंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे. भाजप व अन्य पक्षांना आता राममंदिराच्या मुद्द्यावरुन राजकारण करण्याची गरज पडणार नाही, असा टोलाही पक्षाचे प्रवक्ते राजदीप सुरजेवाला यांनी लगाविला आहे. 

Ayodhya Verdict : अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा 

अयोध्येतील वादग्रस्त जमीन ही रामलल्लाचीच असून, याठिकाणी राम मंदिर उभारण्यासाठी सरकारला ट्रस्ट बनवावे लागणार आहे. तसेच अयोध्येत सुन्नी सेंट्रल वक्‍फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे सरकारच्या या ऐतिहासिक निकालाचे देशभरातून स्वागत करण्यात आले आहेत.  

बाबरी मशिदीच्या जागेत मंदिराचे अवशेष : सुप्रिम कोर्ट

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, की देशात शांततेचे सलोख्याचे वातावरण राहावे. काँग्रेस राम मंदिर बनविण्याच्या बाजूने आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. देशात शांतीचे वातावरण कायम ठेवावे. श्रीराम हे त्यागाचे प्रतिक आहेत, ते सर्वधर्म समभाव, प्रेम आहे. भेदभावासाठी कधी याचा वापर होऊच शकत नाही. 1993 मध्ये काँग्रेस सरकारनेच ही जमीन अधिग्रहण केली होती. अयोध्येतील निकाल हा श्रेय घेण्यासारखा नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We respect the verdict of Supreme Court in Ayodhya case says Randeep Surjewala