लेहचे लोकेशन चीनमध्ये दाखवलं; भारताने ट्विटरला दिला इशारा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

लडाख आणि जम्मू काश्मीर हे भारताचा अविभाज्य भाग असून भारताच्या संविधानानुसार तिथं सरकार काम करतं असंही अजय साहनी यांनी ट्विटरला सुनावले आहे.

नवी दिल्ली - भारताच्या ताब्यात असलेल्या लेह लडाखचे लोकेशन चीनमध्ये दाखवल्यानं भारताने ट्विटरला इशारा दिला आहे. सरकारने ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांना या प्रकरणी काळजीपूर्वक आणि संवेदनशिलतेनं काम करण्यास सांगितले आहे.

केंद्र सरकारचे आय़टी सचिव अजय साहनी यांनी ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांना या प्रकरणी इशारा देत पत्र लिहिलं आहे. ट्विटरवर भारताचा नकाशा चुकीचा दाखवल्याने सरकारने आक्षेप नोंदवला आहे. ट्विटरवर 18 ऑक्टोबरला लेहचे लोकेशन जम्मू काश्मीर चीनमध्ये दाखवलं होतं. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लेह हा भारतातील केंद्रशासित प्रदेश लडाखचा एक भाग आहे. लडाख आणि जम्मू काश्मीर हे भारताचा अविभाज्य भाग असून भारताच्या संविधानानुसार तिथं सरकार काम करतं असंही अजय साहनी यांनी ट्विटरला सुनावले आहे. ट्विटरला अजय साहनी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, भारतीयांच्या भावनांचा तुम्ही सन्मान करायला हवा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ट्विटरने भारताच्या एकतेचा केलेला अपमान कधीच सहन केला जाणार नाही आणि हे कायद्याचं उल्लंघन आहे. अशा कृतीने फक्त ट्विटरची प्रतिमा खराब होते असं नाही तर त्यांच्या तटस्थ आणि निष्पक्ष भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होते असं आय़टी सचिव अजय साहनी यांनी म्हटलं आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही काळापासून तणावाचं वातावरण आहे. लडाखमधील संघर्षामुळे दोन्ही देशांनी थंडीच्या काळात एकमेकांच्या समोर उभा राहतील. भारताने लडाख मुदद्यावरून चीनच्या वक्तव्यांचा जोरदार विरोध केला आहे. सोशल नेटवर्किंग साइट आणि नकाशामध्ये चुकीची माहिती दिल्याचे प्रकार याआधीही घडले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twitter shows leh in china india it secratery letter to CEO