विमान अपहरणप्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता 

पीटीआय
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली (पीटीआय) : इंडियन एअरलाइन्सच्या नवी दिल्ली - श्रीनगर विमानाचे 1981 मध्ये अपहरण करून ते पाकिस्तानातील लाहोर विमानतळावर उतरविण्यास भाग पाडल्याच्या प्रकरणामध्ये आज दिल्ली न्यायालयाने दोघा आरोपींना निर्दोष मुक्त केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजय पांडे यांनी या प्रकरणातील आरोपी ताजिंदरपाल सिंग आणि सतनाम सिंग यांना दिलासा दिला. या दोन्ही आरोपींवर विमान अपहरणप्रकरणी खटला सुरू होता. 

अपहरण केलेले विमान लाहोरमध्ये उतरल्यानंतर या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा ठोठविण्यात आली होती. शिक्षा भोगल्यानंतर पाकिस्तानकडून त्यांचे 2000मध्ये भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्यानंतर आपल्या विरोधातील आरोप रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दोघांनीही न्यायालयात दाखल केली होती. मात्र, सत्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. 2011मध्ये दिल्ली पोलिसांनी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सत्र न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. या दोघांना जुलै मध्ये न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two acquitted of plane hijacking case