भारत-पाकिस्तान फाळणीत झाली ताटातूट, तब्बल 74 वर्षांनंतर भेट!

india pakistan
india pakistanesakal

भारत-पाकिस्तान फाळणीच्या (india-pakistan partition) वेळी एक भाऊ कुटुंबापासून विभक्त झाला. महंमद सिद्दीकी (80) आणि हबीब अशी दोन्ही भावांची नावे आहेत. सिद्दीकी पाकिस्तानातील फैसलाबाद येथे राहतो आणि हबीब भारतातील पंजाबमधील फुलनवाला (लुधियाना) येथे राहतो.

भेटीचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर

पाकिस्तानच्या (pakistan) करतारपूर कॉरिडॉरने (Kartarpur Corridor) दोन विभक्त भावांसाठी पुन्हा एकदा आनंदाची पर्वणी मिळवून दिली आहे. 74 वर्षांनंतर प्रियजनांना भेटण्याची ही संधी होती. जेव्हा ते कर्तारपूर कॉरिडॉरवर भेटले तेव्हा दोघेही आपल्या अश्रूंचा बांध फुटला. आणि एकमेकांना मिठी मारून रडले. यावेळी उपस्थित कुटुंबीयांचेही डोळे भरून आले. या भेटीने सर्वजण आनंदी होते. यावेळी दोघांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, या कॉरिडॉरमुळे विभक्त कुटुंबांना पुन्हा एकत्र आणण्यास खूप मदत होते. त्यांच्या बैठकीला गुरुद्वारा व्यवस्थापनाचे अधिकारीही उपस्थित होते. त्यांच्या भेटीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला, जो पाहून अनेकांना आनंद झाला.

भारत-पाकिस्तान फाळणीत झाली ताटातूट, तब्बल 74 वर्षांनंतर भेट!

गेल्या वर्षी देखील नोव्हेंबरमध्ये करतारपूर कॉरिडॉरवर 73 वर्षांनी दोन मित्र भेटले होते. भारतात राहणारे सरदार गोपाल सिंग (94) आणि पाकिस्तानचे मुहम्मद बशीर (91) हे दोघेही फाळणीच्या वेळी वेगळे झाले. त्याचप्रमाणे 2019 मध्येही कर्तारपूर कॉरिडॉर हे दोन विभक्त भावांच्या भेटीचे साधन बनले होते. त्यावेळचे भारतातील रहिवासी असलेले दलबीर सिंग फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलीत त्यांचा मोठा चुलत भाऊ अमीर सिंग यांच्यापासून वेगळे झाले होते.

india pakistan
कुलगाम चकमक : पाकिस्तानी दहशतवादी बाबर ठार, पोलीस कर्मचारी शहीद

कर्तारपूर कॉरिडॉर म्हणजे काय?

पंजाबमधील डेरा बाबा नानक ते आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत कॉरिडॉर भारतात बांधण्यात आला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या नारोवाल जिल्ह्यातून गुरुद्वारापर्यंत एक कॉरिडॉर बनवण्यात आला आहे. करतारपूर हे पहिले गुरुद्वारा मानले जाते आणि त्याची पायाभरणी गुरु नानक देवजींनी केली होती. येथे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भारतातून जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी व्हिसामुक्त प्रवासाची व्यवस्था आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com