कालव्यात फेकले
जुम्मादिनने सांगितले की, १४ जुलैला रात्रीच तो मुलींना मारणार होता. पण त्यांना मारू शकला नाही. दुसऱ्या दिवशी त्याने दोन्ही मुलींसह सर्व कुटुंबाला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर एका मुलीला मोटारसायकलवर पुढे बसवून तर दुसरीला पाठीवर घेऊन तो घेऊन गेला आणि त्यांना कालव्यात फेकले.
जिंद, (हरियाना) - तंत्रसिद्धीसाठी आठ वर्षांत पाच चिमुकल्यांचा जीव नराधम वडिलांनी घेतल्याची घटना डिडवाडा येथे उघडकीस आली. आरोपी जुम्मादिनने पंचायतीसमोर गुन्ह्याची कबुली दिली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पोलिसांनी मांत्रिक खजानसिंह याला ताब्यात घेतले. तंत्रसिद्धीसाठी पत्नीच्या पोटात वाढत असलेल्या गर्भाच्या जन्मापूर्वी दोन मुलींचा बळी घेणे आवश्यक असल्याचे मांत्रिकाने सांगितले होते. त्यानुसार त्यांना मारुन टाकल्याचे जुम्मादिनने कबूल केले. मुस्कान (वय ११) आणि निशा (वय ७) या मुलींना काही दिवसांपूर्वी त्याने ठार केले. आठ वर्षांपूर्वी नऊ महिन्याच्या बालिकेचा गळा दाबून खून केला तर पाच वर्षांपूर्वी एका वर्षांचा आर्यन आणि दोन वर्षांचा नबी यांना सेल्फस हे विषारी औषध खायला घालून मारले.
कालव्यात फेकले
जुम्मादिनने सांगितले की, १४ जुलैला रात्रीच तो मुलींना मारणार होता. पण त्यांना मारू शकला नाही. दुसऱ्या दिवशी त्याने दोन्ही मुलींसह सर्व कुटुंबाला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर एका मुलीला मोटारसायकलवर पुढे बसवून तर दुसरीला पाठीवर घेऊन तो घेऊन गेला आणि त्यांना कालव्यात फेकले.
Edited By - Prashant Patil