काँग्रेस नेत्याचा कोरोना चाचणीस नकार, संपर्कातील दोन माजी मंत्री पॉझिटिव्ह|Congress Leader Corona Positive | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

DK Shivkumar Closed Contact found corona positive

काँग्रेस नेत्याचा कोरोना चाचणीस नकार, संपर्कातील दोन माजी मंत्री पॉझिटिव्ह

बंगळुरू : देशातील कोरोना रुग्णसंख्या (India Corona Cases) वाढत असताना कर्नाटकचे काँग्रेस प्रमुख डी. के. शिवकुमार (Karnataka Congress Leader DK Shivkumar) यांनी कोरोना चाचणी करण्यास नकार दिला. मी ठणठणीत असून तुम्ही माझ्यावर कोरोना चाचणीसाठी सक्ती करू शकत (Congress Leader Refused Corona Test) नाही, असं त्यांनी डॉक्टरांना म्हटलं होतं. त्यांनी सरकारवर टीका देखील केली होती. त्यानंतर आता त्यांच्या संपर्कातील दोन माजी मंत्र्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

हेही वाचा: 'मी ठणठणीत आहे, नमुने देणार नाही', काँग्रेस नेत्याचा कोरोना चाचणीस नकार

दोन माजी मंत्री पॉझिटिव्ह -

सध्या कर्नाटकमध्ये मेकेदातु पेयजल वॉटर प्रोजेक्टवरून राजकारण तापलं आहे. त्यासाठी विरोधी पक्षाने मोर्चा काढला असून त्यामध्ये हजारो लोकांची गर्दी जमवली होती. यामध्येच कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डी. के. शिवकुमार सहभागी होते. त्यांना कोरोना चाचणी करण्यास सांगितले असता त्यांनी नकार देत सरकारवर टीका केली. पण, माजी मंत्री एच. एम. रेवन्ना आणि माजी मंत्री इब्राहीम दोघांचाही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राज्य काँग्रेसच्या इतर आमदारांसोबत झालेल्या बैठकीत इब्राहिम देखील सहभागी झाले होते. तसेच मोर्चादरम्यान हे दोन्ही पॉझिटिव्ह नेते शिवकुमार यांच्या संपर्कात होते

काय म्हणाले होते शिवकुमार? -

कर्नाटक सरकारने (Karnataka Government) मेकेदातु मोर्चातील नेते आणि सहभागींचे नमुने गोळा करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना पाठवले होते. त्यावेळी डी. के. शिवकुमार यांनी मला कोणतीही लक्षणं नाही, असा दावा करत कोरोना चाचणी करण्यास नकार दिला होता. ''मी लोकप्रतिनिधी असून काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना कळवू. मी ठणठणीत आहे. तुम्ही कोरोना चाचणीसाठी माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही. मला देशातील कायदा माहिती आहे. तुमच्या मंत्र्यांना सांगा की मी ठीक आहे. मी चाचणीसाठी नमुने देत नाही आणि त्याची गरज नाही'' असं त्यांनी डॉक्टरांना म्हटलं होतं.

कोरोना चाचणी नकार देणं योग्य आहे का? -

देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना एका पक्षाच्या प्रादेशिक प्रमुखाचं असं वागणं योग्य आहे का? असा सवाल करत सर्वच स्तरांवरून शिवकुमार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी देखील शिवकुमार यांच्यावर टीका केली असून आम्हाला त्यांच्या जीवाची काळजी आहे, असं म्हटलं. पण, त्यांनी कोरोना चाचणीला नकार दिला हे कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Karnataka
loading image
go to top