Punjab Train Accident: दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक! ट्रेन चालक गंभीर जखमी, प्रवासी गाडीही अडकली; नेमकं काय घडलं?

Punjab Train Accident: पंजाबमधील फतेहगढ साहिबमधील सरहिंदमधील माधोपूरजवळ पहाटे मोठा अपघात झाला. रेल्वेच्या दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या. या धडकेत दोन रेल्वे चालक जखमी झाले. जखमींना श्री फतेहगड साहिब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
Two freight trains collided in Punjab
Two freight trains collided in Punjab esakal

Punjab Train Accident:

पंजाबमधील फतेहगढ साहिबमधील सरहिंदमधील माधोपूरजवळ पहाटे मोठी दुर्घटना टळली. रेल्वेच्या दोन मालगाड्यांची मोठी धडक झाली. या धडकेत दोन रेल्वे चालक जखमी झाले. जखमींना श्री फतेहगड साहिब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटल फतेहगढ साहिब येथून राजिंदर हॉस्पिटल पटियाला येथे पाठवण्यात आले आहे.

स्थानिक माध्यामांनी दिलेल्या वृत्तानुसार, सरहिंद रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माधोपूर चौकीजवळ रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास मालगाडीचा अपघात झाला. येथे दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मालगाडीचे इंजिन उलटले आणि एक प्रवासी गाडीही त्यात अडकली. Punjab News Update

Two freight trains collided in Punjab
Lok Sabha Exit Poll 2024 : गडकरी नागपूरचा गड राखणार! ‘रामटेक’चे भाकित रामभरोसे; एक्झिट पोलचा अंदाज

या अपघातात दोन लोको पायलट जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या लोको पायलटची नावे सहारनपूर येथील 37 वर्षीय विकास कुमार आणि 31 वर्षीय हिमांशू कुमार अशी आहेत. त्यांना 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

Two freight trains collided in Punjab
Lok Sabha Election Vote Counting: अंबड वेअर हाऊस परिसरात कडेकोट बंदोबस्त! लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com