Railway Accident: पश्चिम बंगालमधील मोठा रेल्वे अपघात! एका मालगाडीने दुसऱ्या मालगाडीला दिली धडक, 12 डबे रुळावरून घसरले

ओंडा स्थानकात ही घटना घडली
Railway Accident
Railway AccidentEsakal
Updated on

पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे रेल्वे अपघात झाला आहे. येथे दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या, त्यानंतर अनेक डबे रुळावरून घसरले आहेत. ही घटना आज (रविवारी) पहाटे चार वाजता ओंडा स्थानकात घडली. या घटनेत मालगाडीचा चालक जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका मालगाडीने दुसऱ्या मालगाडीला मागून धडक दिली, त्यामुळे सुमारे 12 डबे रुळावरून घसरले आहेत.(Latest Marathi News)

पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे आज पहाटे ४ वाजता ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार एक मालगाडी ओंडा स्थानकावरून जात असताना मागून दुसऱ्या मालगाडीने धडक दिली. या घटनेमुळे 12 डबे रुळावरून घसरले. घटनेनंतर डबे रुळावर पडले होते. (Latest Marathi News)

Railway Accident
Russia War : रशियातील गृहयुद्ध टळलं! वॅगनर प्रमुखाने दिले सैन्याला मागे हटण्याचे आदेश; रक्तपात टाळण्यासाठी निर्णय

'अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही'

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मालगाड्या रिकाम्या होत्या. अपघाताचे कारण काय आणि दोन्ही गाड्यांची टक्कर कशी झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघातामुळे आद्रा विभागात अनेक गाड्यांवर परिणाम झाला आहे. या दुर्घटनेनंतर पुरुलिया एक्स्प्रेससारख्या काही गाड्या या विभागातून जाण्यासाठी अप मार्ग लवकरात लवकर खुला करण्याचा रेल्वे अधिकारी प्रयत्न करत आहेत.(Latest Marathi News)

आद्रा रेल्वे विभाग (ADRA) पश्चिम बंगालच्या 4 जिल्ह्यांमध्ये सेवा प्रदान करते. यामध्ये पश्चिम मिदनापूर, बांकुरा, पुरुलिया आणि बर्दवान यांचा समावेश आहे. यासह झारखंडमधील 3 जिल्हे, धनबाद, बोकारो आणि सिंगभूम दक्षिण पूर्व रेल्वेच्या अंतर्गत येतात.(Latest Marathi News)

Railway Accident
Mumbai : पहिल्याच पावसात त्रेधा ! सखल भाग पाण्यात; मुंबईत २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com