देशात दोन भारत! बजेटवरच्या भाषणात काय म्हणाले राहुल गांधी?

देशात दोन भारत! बजेटवरच्या भाषणात काय म्हणाले राहुल गांधी?

नवी दिल्ली : लोकसभेत राहुल गांधींचं बजेटसंदर्भात भाषण सुरु आहे. या भाषणात त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राहुल गांधी (Rahul Gandhi) प्रतिक्रिया देत आहेत. या भाषणात त्यांनी म्हटलंय की, देशात सध्या दोन भारत आहेत. एक श्रीमंतासाठीचा भारत आहे. ज्यांना कशाचीही तोषिस पडत नाही. तर दुसरीकडे आणखी एक भारत आहे, जो गरीबांचा आहे. आणि या दोन भारतामधील अंतर वाढतच चाललं आहे. त्यामुळे सरकारमधील मित्रांना मी सांगू इच्छितो की, जे देशात घडतंय ते काळजीचं कारण आहे.

देशात दोन भारत! बजेटवरच्या भाषणात काय म्हणाले राहुल गांधी?
...तर योगी आदित्यनाथ यांच्यावरील खटले मागे घेऊ - अखिलेश यादव

पुढे ते म्हणाले की, रोजगार शोधण्यासाठी यूपी, बिहारमध्ये रोजगारासाठी तरुणांनी काय केलं त्यावर तुम्ही बोलला नाहीत. तरुणांना रोजगार नाहीये, हे वास्तव आहे. संपूर्ण देशातील तरुण आज रोजगार शोधत आहे. तुमचं सरकार ते देऊ शकत नाहीये. मागच्या वर्षी तीन कोटी युवक रोजगार गमावला आहे. रोजगार देण्याची भाषा सोडा इथं रोजगार चालले आहेत.

तुम्ही मेक इन इंडिया स्टार्ट अप इंडिया म्हणलाात, मात्र, काही मिळालं नाही. हे वास्तव असल्याचं आपणही चांगलंच जाणता, म्हणूनच तुम्ही तुमच्या भाषणा त्याबद्दल काहीच बोलू शकला नाहीत. जर आपण बेरोजगारीबद्दल बोललात तर देशातला तरुण तुमच्याकडे पाहून म्हणेल की, काय चेष्टा लावलीये...?

टीका केल्यावर केंद्र सरकारला सहन का होत नाही. मात्र, लाखो कोटी रुपये तुम्ही मोठ्या उद्योगपतींना दिले आहेत. असंघटीत क्षेत्रावर तुम्ही आक्रमण केले. नोटबंदी, चुकीचा जीएसटी आणि कोरोनामधील तारांबळ यामुळे आज 84 टक्के भारतातील लोकांचं उत्तन्न घटलं असून ते गतीने गरीबीकडे ढकलले जात आहेत. साठ वर्षांबाबत आपण बोललात यूपीएने 23 कोटी लोकांना दहा वर्षांत गरीबीतून बाहेर काढलं होतं. हा आमचा आकडा नाहीये. तर ही खरी आकडेवारी आहे. 23 कोटी लोकांना तुम्ही पुन्हा गरीबीत ढकललं आहे. फॉर्मल सेक्टरमध्ये मोनोपॉली बनत चालली आहे.

देशात दोन भारत! बजेटवरच्या भाषणात काय म्हणाले राहुल गांधी?
सगळ्यात जास्त दारु पिणारे भाजपमध्येच; नवाब मलिकांची टीका

पुढे ते म्हणाले की, एका व्यक्तीला भारताच्या सगळे एअरपोर्ट्स, पॉवर, ट्रान्समिशन, मायनिंग, ग्रीन एनर्जी, एडीबल ऑईल हे सगळं देऊन टाकण्यात आलंय. दुसरीकडे पेट्रोकेमीकल, टेलिकॉम, इ-कॉमर्स अशी अंबानीकडे मोनोपॉली आहे. पैसे ठराविक लोकांकडे जात आहेत.

असंघटीत क्षेत्राला अधिक बेजार केल्यामुळे दोन भारत तयार झाले आहेत. जर तुम्ही त्यांची मदत केली असती, तर मॅन्यूफॅक्चरिंग सेक्टर तयार होऊ शकला असता.

मेक ईन इंडियाची गोष्ट करता मात्र, मेड इन इंडिया होऊच शकत नाहीत. कारण त्यांना तुम्ही संपवून टाकलं आहे. मेड इन इंडिया करण्यासाठी स्माल आणि मिडियम इंडस्ट्रीला उभं करावं लागतं. जे आता नष्ट होत चालली आहेत. गेल्या पाच वर्षांत मॅन्य्फॅक्टरींग जॉब्स 46 टक्के गेले आहेत. हे नरेंद्र मोदींनी केलं आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com