सगळ्यात जास्त दारु पिणारे भाजपमध्येच; नवाब मलिकांची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik

सगळ्यात जास्त दारु पिणारे भाजपमध्येच; नवाब मलिकांची टीका

मुंबई: महाराष्ट्रात राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरून राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्यात येत असल्याचं भाजपने म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी बोलताना सुपरमार्केटमध्ये वाईन उपलब्ध करण्याच्या राज्यशासनाच्या निर्णयाचं समर्थन करत भाजपवर टीका केली आहे. सर्वांत जास्त दारु पिणारे लोक हे भाजपमध्येच असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच ज्या भाजप नेत्यांचे वाईन शॉप, कारखाने आहेत, त्यांनी ते बंद करावेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: ...तर योगी आदित्यनाथ यांच्यावरील खटले मागे घेऊ - अखिलेश यादव

नवाब मलिक म्हणाले की, भाजपच्या नेत्यांचे वाईन शॉप आहेत. भाजपच्या काही माजी मंत्र्यांचे बार आहेत त्याचे आधी परवाने रद्द करा. एवढा दारुचा तिटकारा असेल तर ते कारखाने बंद करावेत. भाजप कार्यकर्त्यांनीही दारु पिऊ नये. भाजप नेत्यांनी शपथ घेतली पाहिजे की आता दारू पिणार नाही.

पुढे ते म्हणाले की, सर्वांत जास्त दारु पिणारे लोक भाजपमध्येच आहेत. मध्यप्रदेश हा मद्यप्रदेश झाला आहे. त्याठिकाणी तर होम बारचा निर्णय होतोय. सर्वांत कमी दारुची दुकाने असलेलं राज्य महाराष्ट्र आहे. या राज्यातील विरोधी पक्षातल्या नेत्यांनी शेजारच्या राज्यातील नेत्यांना जाऊन भेटून यावर भाष्य केलं पाहिजे.

हेही वाचा: "ऊपर शेरवानी, अंदर परेशानी": मोदींच्या पोशाखावर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची टीका

नितेश राणेंच्या अटकेबाबत म्हणतात...

नितेश राणेंवर खुनाच्या प्रयत्नाची केस दाखल झाल्यानंतर ते न्यायालयात गेले आहेत. त्यांनी अटक होऊ नये म्हणून शक्य ते सगळे प्रयत्न करुन पाहिले आहेत. सरतेशेवटी त्यांना आता न्यायालयाच्या आदेशाने अटक झाली आहे. भाजप नेते म्हणतात न्यायालय सरकारच्या दडपशाहीने चालते आहेत पण ते बोलणे योग्य नाही.

Web Title: Bjp Has More People Of Drinking Wine Criticism Of Nawab Malik On Wine In Super Markets Of Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top