जन्मठेप भोगताना सूत जुळलं, लग्नासाठी मिळाली १५ दिवसांची रजा; पुन्हा तुरुंगात जावं लागणार

३४ वर्षीय प्रिया सेठ आणि हनुमान प्रसाद यांच्या लग्नाची चर्चा होण्याचं कारण म्हणजे दोघेही वेगवेगळ्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांना हायकोर्टाच्या आदेशानंतर १५ दिवसांची पॅरोल रजा मंजूर झाली होती.
Murder Convicts Get 15 Days Parole For Marriage Return To Jail After

Murder Convicts Get 15 Days Parole For Marriage Return To Jail After

Esakal

Updated on

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या दोन कैद्यांनी लग्न केल्याच्या प्रकाराची चर्चा सध्या होत आहे. सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. ३४ वर्षीय प्रिया सेठ आणि हनुमान प्रसाद यांच्या लग्नाची चर्चा होण्याचं कारण म्हणजे दोघेही वेगवेगळ्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. तुरुंगातच दोघांची एकमेकांशी ओळख झाली आणि प्रेमात पडले. त्यानंतर आता लग्नासाठी १५ दिवसांच्या पॅरोलवर त्यांची सुटका झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com