फंगसच्या नव्या स्ट्रेनने दिल्ली AIIMS मध्ये दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

doctors

फंगसच्या नव्या स्ट्रेनने दिल्ली AIIMS मध्ये दोघांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशभरात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीये. त्यात आता फंगसच्या नव्या स्ट्रेनने एन्ट्री केली आहे. नवी दिल्ली येथे फंगसच्या नव्या स्ट्रेनचे रूग्ण आढळून आले आहेत. दिल्ली एम्समधील डॉक्टरांनी क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव पलमनरी डिजिज (COPD) ने पीडित दोन रूग्णांमध्ये एस्परगिलस लेंटुलस झाल्याची (Aspergillus lentulus) पूष्टी केली आहे. चिंतेची बाब म्हणजे, शर्थिच्या प्रयत्नांनंतरदेखील फंगसच्या नव्या स्ट्रेनने संक्रमित दोन्ही रूग्णांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही. उपचार सुरू असताना दोन्ही रूग्णांचा मृत्यू झाला.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एस्परगिलस लेंटुलस ही एक एस्परगिलस फंगसची एक प्रजाति आहे. ज्यामध्ये फुफ्फुसे संक्रमित होतात. फुफ्फुसांमध्ये संक्रमण होत असल्याने फंगसच्या इतर स्ट्रेनच्या तुलनेत या स्ट्रेनमध्ये मृत्यूदर तुलनेने अधिक आहे. विदेशात अशा प्रकारचे संक्रमण झालेले रूग्ण आढळून आले आहेत. डॉक्टरांच्या मते भारतात या नव्या स्ट्रेनची पहिलीच घटना असू शकते. नव्या प्रकारच्या फंगस स्ट्रेनबाबत पहिल्यांदा 2005 मध्ये भाष्य करण्यात आले होते.

इंडियन जर्नल ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजी (IJMM) मध्ये प्रकाशित झालेल्या केस रिपोर्टनुसार, ज्या दोन रूग्णांमध्ये फंगसचा नवा स्ट्रेन आढळून आला होता, त्यातील एका रूग्णाचे वय 50 ते 60 वर्ष इतके होते. तर दुसऱ्या रूग्णाचे वय 45 वर्ष इतके होते. पहिल्या रूग्णावर सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते, मात्र तेथे प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला एम्समध्ये भरती करण्यात आले होते.

हेही वाचा: Mucormycosis : कोविड- १९ आणि ब्लॅक फंगस, लक्षणे आणि उपचार जाणून घ्या

इंजेक्शनचादेखील झाला नाही फायदा

फंगसच्या नव्या स्ट्रेनने संक्रमित रूग्णाला Amphotericin B आणि ओरल Voriconazole इंजेक्‍शन देण्यात आले होते. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. इंजेक्शन दिल्यानंतर साधारण एक महिना रुग्णाच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा दिसून आली नाही आणि अखेर उपचार सुरू असताना रूग्णाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या रूग्णाला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर एम्सच्या आपतकालिन विभागात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालादेखील Amphotericin B इंजेक्शन देण्यात आले होते. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. साधारण एक आठवड्यानंतर शरिरातील अनेक अवयव निकामी झाल्यानंतर रूग्णाचा मृत्यू झाला.

काळ्या बुरशीची प्रकरणे अधिक

देशात उद्भवलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मोठ्या संख्येने काळ्या बुरशीची प्रकरणे समोर आली होती. मधुमेह आजाराने ग्रस्त असलेल्या आणि कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीचे संक्रमण होण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे अनेक रूग्ण बरे झाले, तर काही जणांची प्रकृती गंभीर झाल्याचीही प्रकरणे समोर आली होती.

loading image
go to top