गोव्यात २ रशियन महिला अन् एका आसामच्या महिलेची हत्या, हात-पाय बांधून अत्याचारानंतर हत्येचा संशय; मृतदेह नग्नावस्थेत

Goa 2 russian women murder case गोव्यात २ रशिनय महिलांच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीनं केलेल्या दाव्यांमुळे खळबळ उडाली आहे. आरोपीने अत्याचारानंतर अनेक तरुणींना संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Goa Murders Two Russian Women And Assam Woman Killed Police Probe Serial Killer Angle

Goa Murders Two Russian Women And Assam Woman Killed Police Probe Serial Killer Angle

Esakal

Updated on

गोव्यात २ रशियन महिलांची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे. गोव्यातील गिरकरवाडा हरमल इथं भाड्यानं घेतलेल्या एका फ्लॅटमध्ये एलेना कस्थनोव्हा हिचा मृतदेह आढळून आला. यानंतर तिचा लिव्ह इन पार्टनर एलेक्सी लियोनोव्हला अटक केल्यानंतर त्यानं आणखी एका रशियन महिलेची हत्या केल्याचाही खुलासा केला. दुसऱ्या रशियन महिलेचं नाव एलेना वानीवा असं आहे. तिचा मृतदहे गोव्यातील मधलावाडा मोरजी इथं आढळून आला. आता या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. एलेक्सी लियोनोव्ह हा सिरीयल किलर असल्याचा संशय असून त्यानं १० ते १५ महिलांची हत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com