ट्रान्सजेंडर्सने रचला इतिहास! आव्हानांना तोंड देत 'या' सरकारी रुग्णालयात डॉक्टर म्हणून रुजू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Prachi Rathod, Medical Officer,

ट्रान्सजेंडर्सने रचला इतिहास! आव्हानांना तोंड देत 'या' सरकारी रुग्णालयात डॉक्टर म्हणून रुजू

हैदराबाद : तेलंगणातील प्राची राठोड आणि रुथ जॉन पॉल या दोन तृतीयपंथीयांनी इतिहास रचला आहे. तेलंगणा राज्यातील सरकारी सेवेत रुजू होणारे प्राची आणि रुथ पहिले ट्रान्सजेंडर डॉक्टर ठरले आहेत. (two transgender doctors join govt service in telangana )

प्राची राठोड आणि रूथ जॉन पॉल या दोन्ही ट्रान्सजेंडर डॉक्टरांनी नुकतीच सरकारी उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये (ओजीएच) वैद्यकीय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. आम्ही दोघांनी लहानपणापासूनच सामाजिक दृष्टीकोन आणि भेदभावाचा त्रास सहन केला. त्यामुळे इथपर्यंत पोहोचणं सोपं नव्हत, अस दोघांनी सांगितलं.

उस्मानिया जनरल हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. नागेंद्र यांनी सांगितलं की, उस्मनिया हॉस्पिटलमध्ये ट्रान्सजेंडर क्लिनिक सुरू करण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची 3 पदे रिक्त होती. या पदांसाठी ३६ डॉक्टरांनी अर्ज केले होते. या पदासाठी आम्हाला ट्रान्सजेंडर समुदाय आणि एचआयव्हीग्रस्त वैद्यकीय व्यावसायिकांना प्राधान्य द्यायचे होते. अशा प्रकारे आम्ही 3 डॉक्टरांची भरती केली आहे. यातील 2 ट्रान्सवूमन असून एक एचआयव्ही बाधित वैद्यकीय अधिकारी आहे.

हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी या पदावर रुजू झाल्यानंतर डॉ. प्राची राठोड म्हणाल्या की, 'मला खूप आनंद होतोय. सरकारी रुग्णालयात ट्रान्सजेंडर म्हणून काम करण्याची ही पहिलीच वेळ असेल. एक डॉक्टर म्हणून, लिंगभेद न करता रूग्णांवर उपचार करणे चांगले वाटते. प्राची राठोड यांनी २०१५ मध्ये आदिलाबाद येथील मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले.

टॅग्स :Telanganadoctor