esakal | जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
sakal

बोलून बातमी शोधा

two unidentified terrorists killed in shopian encounter at jammu kashmir

जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यांतील चाकुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. जवानांनी परिसरात ताब्यात घेतला असून, दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यांतील चाकुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. जवानांनी परिसरात ताब्यात घेतला असून, दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार; दोन जवान हुतात्मा

जम्मू-काश्मीर खोऱ्यात काही दिवसांत दहशतवादी कारवाया वाढत होत्या. जवानांनी राबवलेल्या चार मोहिमांमध्ये 10 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले आहे. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज (बुधवार) चकमक झाली. यावेळी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जवानांकडून लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्ला याला ठार केले होते. सैफुल्लाचा तीन दहशतवादी हल्ल्यात सहभाग होता. ज्यामध्ये सीआरपीएफचे तीन जवान हुतात्मा झाले होते. तर, आत्मसमर्पण केलेला दहशतवादी डोडा येथील रहिवाशी असून, त्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिली होती.