पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार; दोन जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
Thursday, 1 October 2020

भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने गोळीबार केला. यामध्ये दोन जवान हुतात्मा झाले असून, चौघे जण जखमी झाले आहेत. भारतीय जवानांनीही चोख प्रत्यूत्तर दिले असून, सीमेवर दोन्ही बाजुंकडून जोरदार गोळीबार सुरु आहे.

श्रीनगर: भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने गोळीबार केला. यामध्ये दोन जवान हुतात्मा झाले असून, चौघे जण जखमी झाले आहेत. भारतीय जवानांनीही चोख प्रत्यूत्तर दिले असून, सीमेवर दोन्ही बाजुंकडून जोरदार गोळीबार सुरु आहे.

Video: लहान मुलाने वाचविले आजीचे प्राण

पाकिस्तानने आज (गुरुवार) सकाळी कृष्णा घाटीमध्ये गोळीबार सुरू केला होता. या गोळीबारात लान्स नायक हुतात्मा झाले. कुपवाडातील नौगाम सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात दोन जवान हुतात्मा झाले असून, चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीमेवर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे.

दरम्यान, कृष्णा घाटीमध्ये झालेल्या गोळीबारात लान्स नायक करनेल सिंह हे हुतात्मा झाले असून, अन्य एक जवान जखमी झाला आहे. या जखमी जवानाचे नाव विरेंद्र सिंह आहे. त्याच्या डोळ्याला मार बसला आहे. विरेंद्र सिंह यांना राजौरीच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Video: 'योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात कधीही गाडी पलटी होते'

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. सोमवारी (ता. 30) राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. या काळात पाकिस्तानकडून मोर्टार डागण्यात आले होते. यावेळीही भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan firing continues border two soldiers martyred at kashmir