esakal | व्हॉट्स ॲपवर दोन व्हायरस; ‘सीईआरटी-इन’ चा सावधगिरीचा इशारा

बोलून बातमी शोधा

Whatsapp

व्हॉट्स ॲपवर दोन व्हायरस; ‘सीईआरटी-इन’ चा सावधगिरीचा इशारा

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - लोकप्रिय मेसेजिंग ॲप असलेल्या व्हॉट्‌स ॲपच्या जुन्या व्हर्जनमध्ये दोन व्हायरसनी शिरकाव केला आहे. मात्र, त्यांचा कधी दुरुपयोग झाला, असे मानण्याचे कोणतेही कारण नसल्याचा खुलासाही व्हॉट्‌स ॲपने केला आहे.

सायबर हल्ल्यांचा सामना करणाऱ्या आणि भारतीय सायबर क्षेत्राला मार्गदर्शन करणाऱ्या ‘सीईआरटी-इन’ या तंत्रज्ञान संस्थेने याबाबत सूचना जारी केल्या आहेत. त्यात संवेदनशील माहिती उघड होण्याबाबत युजरला सावध करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर व्हॉट्‌स ॲपने अधिकृत निवेदनात हे स्पष्टीकरण दिले आहे. युजरचे मेसेज सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही संशोधकांसह नियमितपणे काम करतो. आम्हाला जुन्या किंवा कालबाह्य सॉफ्टवेअरवर दोन व्हायरसचे अस्तित्व आढळले.

व्हॉट्‌स ॲप अपडेट करा

‘सीईआरटी-इन’ने शनिवारी (ता. १७) व्हॉट्‌स ॲप आणि व्हॉट्‌स ॲप बिझनेसच्या व्ही२.२१.४.१८ या अँड्रॉईड व्हर्जनवर आणि व्ही२.२१.३२ या आयओएस व्हर्जनमध्ये दोन व्हायरस आढळल्याने उच्च सावधगिरीचा इशारा दिला होता. त्याचप्रमाणे, युजरला गुगल प्ले स्टोअर किंवा आयओएस ॲप स्टोअरमधून व्हॉट्‌स ॲप अपडेट करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.