
एकलुत्या एका मुलीच्या अशा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हे समजताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला.
वाढदिनीच चिमुकलीवर काळाचा घाला; सांबारच्या पातेल्यात पडल्यानं मृत्यू
दोन वर्षाच्या चिमुकलीच्या विचित्र मृत्युने संपूर्ण कृष्णा जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. आंध्र प्रदेश येथे रविवारी घडलेल्या या अपघातात चिमुकलीचा दूर्देवी मृत्यू झाला आहे. गरम सांबाराच्या पातेल्यात पडून या बालिकेचा मृत्यू झाला आहे. कृष्णा जिल्ह्यातील कलागरा गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अपघातानंतर मुलीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र अपघातात तिला अधिक भाजले असल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एकलुत्या एका मुलीच्या अशा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हे समजताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला.
हेही वाचा: देशात २४ तासात कोरोनाचे २७ हजार ४०९ नवे रुग्ण; 347 मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्या मुलीचं नाव तेजस्वी आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार शिवा आणि भानूमत यांची दोन वर्षांची मुलगी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी घरासमोरील अंगणात खेळत होती. वाढदिवसानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था पाहण्यात आई-वडील व्यस्त असल्याने तेजस्वी खेळता खेळता स्वयंपाक घरात गेली. ती खुर्चीवर चढून खेळत असतानाच तोल जाऊन समोरच्या गरम सांबाराच्या पातेल्यात पडली.
मोठा आवाज झाल्याने सर्वजण स्वयंपाकघरात पळत आले, तेव्हा हे पाहून त्यांना धक्का बसला. यावेळी त्यांनी तेजस्वीला तातडीने तिरुवुरु येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला अधिक चांगल्या उपचारांसाठी वियवाडाला हलवण्यात आलं. मात्र सोमवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे.
हेही वाचा: ईडी, एनआयएची पथकं मुंबईत दाखल, धाडसत्र सुरू; मोठे नेते रडारवर
Web Title: Two Year Old Child Dead Andhra Pradesh In Vessel Of Hot Sambar On Her Birthday
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..