esakal | 'सीमेन' झालं 'सेमन'; टाईप करताना झालेल्या एका चुकीने सुटला बलात्कारातील आरोपी
sakal

बोलून बातमी शोधा

'सीमेन' झालं 'सेमन'; टाईप करताना झालेल्या एका चुकीने सुटला बलात्कारातील आरोपी

'सीमेन' झालं 'सेमन'; टाईप करताना झालेल्या एका चुकीने सुटला बलात्कारातील आरोपी

sakal_logo
By
विनायक होगाडे

चेन्नई: टायपिस्टकडून झालेली एक चूक काय करु शकते, हे दाखवून देणारी घटना तमिळनाडूमध्ये घडलीय. टायपिस्टने ‘semen’ ऐवजी ‘semman’ टाईप केल्यामुळे मोठा अनर्थ घडला आहे. ‘semman’ चा तमिळ अर्थ लाल माती असा होता. एका टायपिस्टने केलेल्या या चुकीमुळे बलात्कारातील आरोपीची सुटका झाली. मात्र, त्यानंतर मद्रास हाय कोर्टाच्या लक्षात ही चूक आली आणि त्यांनी खालच्या कोर्टाचा निर्णय बदलला. दोन वर्षांच्या लहान मुलीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका महिलेने तक्रार दाखल केली होती. मद्रास हाय कोर्टाचे न्यायाधीश पी वेलमुर्गन यांनी हा निर्णय बदलला. (Typo almost acquits man accused of sexually assaulting 2 year old)

हेही वाचा: अवघ्या तीन क्लिकमध्ये मिळेल रुग्णवाहिका, तरुणानं तयार केलंय भन्नाट अ‌ॅप

2017 मध्ये हा खटला दाखल झाला होता. ज्या महिलेने तक्रार दाखल केलीय, तिच्या दोन वर्षे 9 महिन्यांच्या मुलीवर शेजारच्या व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत (Protection of Children from Sexual Offences Act - POCSO) या आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. मात्र संशयाचा फायदा देत पोक्सो कोर्टाने आरोपीची सुटका केली होती. त्यानंतर या महिलेने मद्रास हायकोर्टात धाव घेतली आणि मग निर्णय पलटला.

हेही वाचा: मेहंदी, हळद, लग्न, रिसेप्शन; पहा दिशा परमारचे रॉयल लूक्स

नेमकं काय घडलं होतं?

कोर्टाच्या सुनावणीत या महिलेचे स्टेटमेंटमधील “semen” हा शब्द चुकीच्या पद्धतीने लिहून तो तमिळमध्ये “semman” असा लिहण्यात आला होता. या चुकीचा फायदा घेतच या आरोपीला सुटका मिळाली होती. मुलीच्या शरीरावर “semman colour” म्हणजेच लाल मातीचा कलर दिसून आला, असं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं गेलं होतं. मात्र वास्तवात ते “white colour fluid” या अर्थाने होतं. मात्र, या चुकीचा फायदाच त्या आरोपीला मिळाला होता. एक इंग्लिश शब्द तमिळमध्ये लिहल्याने हा इतका मोठा घोळ झाल्याचं दिसून आलं होतं.

loading image