esakal | अवघ्या तीन क्लिकमध्ये मिळेल रुग्णवाहिका, तरुणानं तयार केलंय भन्नाट अ‌ॅप
sakal

बोलून बातमी शोधा

Ambulance

अवघ्या तीन क्लिकमध्ये मिळेल रुग्णवाहिका, तरुणानं तयार केलंय भन्नाट अ‌ॅप

sakal_logo
By
केतन पळसकर

नागपूर : तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या २१ व्या शतकात विविध सुविधांच्या ‘अॅप्स’ने मानवी जीवन सुकर केले आहे. अशाच ऑप्लिकेशन्समध्ये सुविधा देणाऱ्या एका ॲपची भर पडली आहे. रुग्णवाहिका आपल्याला हवी तिथे उपलब्ध करून देणारे हे ‘खोजपाल’ ॲप (khojpal application for ambulance ) आहे. (suhas patil make application for ambulance availability)

हेही वाचा: पेट्रोल-डिझेलला पर्याय : गवतापासून जैविक इंधन प्रकल्पाची मुहूर्तमेढ

आजच्या युगात आपण ‘अॅप्स’द्वारे पाच मिनिटांत कॅब बोलावू शकतो. मात्र, रुग्णवाहिका बोलावल्यानंतर ती पाच मिनिटांनी येईलच याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. ही बाब हेरून ॲफिन्गो टेक्नॉलॉजीचे संचालक सुहास पाटील यांच्या संकल्पनेतून ‘खोजपाल’ हे अॅप साकार झाले. या ॲपचा वापर करून आपण रुग्णवाहिका फक्त तीन क्लिकमध्ये आपल्याला हवी तिथे बोलावू शकू.

रुग्णवाहिकेचा शोध आणि विलंबामुळे आपण रुग्णाच्या जिवाशी नकळत तडजोड करतो. मात्र, या ‘अॅप’द्वारे रुग्णवाहिका शोधणे सुकर होणार आहे. याशिवाय, अँड्रॉइड आणि आयफोनवर चालणारे खोजपाल हे अॅप लोकांना जोडण्यासाठीही मदत करते. जवळपास असणाऱ्या लोकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांना शोधणे आणि त्यांच्याशी संपर्क साधणे, हा या ॲपचा मुख्य उपयोग आहे. ‘खोजपाल'चा वापर करून गरजू कारपूल, विविध खेळ, चालू घडामोडी, भोवतालच्या प्रेक्षणीय स्थळांबाबतची माहिती काही क्लिकमध्येच मिळवू किंवा इतरांना देऊ शकतात.

सुहास पाटील नागपूरचे जावई -

या ॲपला मूर्त रुप देणारे कंपनीचे संचालक सुहास पाटील यांचे सासर नागपूरचे. शंकर मुक्कावार यांचे ते जावई. तर, आई आर्णी (जि. यवतमाळ) येथील प्रतिष्ठीत घराणे दत्तोपंत नीलावार यांची कन्या. या नात्याने सुहास पाटील हे नागपूरकरांचे जावई आहेत.

अशी शोधा रुग्णवाहिका

  • प्ले स्टोअर, ॲप स्टोअर मधून खोजपाल डाऊनलोड करा

  • स्क्रीनवर दिसणारी जवळची रुग्णवाहिका निवडा

  • रुग्णवाहिकेच्या संस्था व्यवस्थापकाची संपर्क करा

  • रुग्णवाहिका निवडल्यानंतर ‘होय’वर क्लिक करा

  • यातील तंत्रज्ञान आपल्याला मार्गाविषयी माहिती देईल

loading image