नवी दिल्ली - मतदारयाद्यांमधील घोळाचा मुद्दा राजकीय रंगमंचावर तापला असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिल्लीत येऊन निवडणूक प्रक्रियेवर तोफ डागली..‘ईव्हीएम’द्वारे मतदानावर आक्रमक आक्षेप नोंदविताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतपत्रिकांद्वारे मतदानाची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच, ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, आम्ही दोघे भाऊ सक्षम आहोत आम्हाला काय करायचे आहे ते करू त्यात तिसऱ्या कोणाचीही आवश्यकता नाही..लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा दिल्लीत आलेले उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य ठाकरे यांच्या समवेत बुधवारी (ता. ६) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. आज सायंकाळी ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीतही ते सहभागी झाले होते. तत्पूर्वी त्यांनी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.बिहारमधील मतदारयादी फेरपडताळणी मोहिमेवरून राजकीय पक्षांमध्ये असंतोष असल्याचा उल्लेख करताना ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टिकास्त्र सोडले. देशात आता राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला (एनआरसी) प्रारंभ झाला आहे का?, हे निवडणूक आयोगाने सांगावे असे आव्हानही त्यांनी सवाल केला..‘आधीच ‘ईव्हीएम’मध्ये मतदारांना आपले मत कुठे जात आहे हे कळत नसताना आता ‘व्हीव्हीपॅट’ काढून टाकण्याचे निवडणूक आयोगाने ठरविले आहे. असे असेल तर निवडणुकांचा फार्स कशासाठी केला जात आहे,’ अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या तडकाफडकी राजीनाम्यावरून विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने सरकारला लक्ष्य केले होते. त्यावर ठाकरे म्हणाले, की धनकड यांना नेमके काय झाले, ते कुठे आहेत यावर चर्चा व्हायला हवी,..उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीत असून त्यांनी काल पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल विचारले असता ‘त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याइतके ते काही महान नाहीत. गद्दार हा गद्दार असतो,’ असा प्रहार त्यांनी केला.राज ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याच्या मुद्द्यावरही उद्धव ठाकरे यांनी यात तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्याची गरज नसल्याची ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले, की आम्ही दोघे भाऊ सक्षम आहोत आम्हाला काय करायचे आहे ते करू त्यात तिसऱ्या कोणाचीही आवश्यकता नाही..संसदेतील कार्यालयाची पाहणीउद्धव ठाकरे यांनी आज संसद भवनातील शिवसेना संसदीय पक्षाच्या कार्यालयालाही भेट दिली. यावेळी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील बरोबर होते. शिवसेनेच्या विभाजनानंतर संसद भवनातील पक्ष कार्यालय हे शिंदे यांच्या पक्षाकडे गेले होते.नवी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर ठाकरे यांच्या शिवसेनेला संसदेत, संविधान सदनामध्ये तिसऱ्या मजल्यावर कार्यालय मिळाले आहे. अर्थात हे कार्यालय शिंदे यांच्या शिवसेना कार्यालयाच्या शेजारीच आहे. उद्धव ठाकरे यांनी यांनी संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत यांच्यासह अन्य खासदारांसमवेत छोटेखानी बैठक घेऊन चर्चा केली..ठाकरे म्हणाले...ट्रम्प मोदींची खिल्ली उडवत आहेतमोदी त्यांना जाब विचारणे तर सोडा परंतु साधे उत्तरही देऊ शकत नाहीपंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्रमंत्री, गृहमंत्री ता या पदांवर भाजपचे प्रचारमंत्री आहेतआपला मित्र आहे, की शत्रू आहे? मधल्या काळात चीनवर बहिष्कार घालण्याबद्दल बोलले होते. आता पंतप्रधान चीनला का जात आहेत?देशाला कणखर पंतप्रधान, कणखर गृहमंत्री हवे आहेतशेतकऱ्यांना रोखण्यासाठी खिळे अंथरले, त्यांना नक्षलवादी म्हटले तेव्हा शेतकरी आठवले नाही का?.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.