esakal | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री?; 'या' फॉर्म्युल्यावर झाली सहमती
sakal

बोलून बातमी शोधा

politics

महाराष्ट्रात 288 जागांपैकी भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्या होत्या. पक्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिल्याने भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकार आघाडीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे खात्यांचे वाटप होतानाही शिवसेनेला 15, राष्ट्रवादीला 14 आणि काँग्रेसला 13 खाती  देण्यात येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री?; 'या' फॉर्म्युल्यावर झाली सहमती

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास महिना होत आला असून, आता राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार अस्तित्वात येणाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादी व काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद असा सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

'इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्राने आज (मंगळवार) महाराष्ट्रातील महाशिवआघाडी सरकारचा सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार महाराष्ट्रात पाच वर्षांसाठी शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार आहे आणि हे पद पाच वर्षे उद्धव ठाकरे यांच्याकडे राहणार आहे. तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे असे दोन उपमुख्यमंत्री राज्याला मिळणार आहेत. 42 खात्यांचे या तिन्ही पक्षांमध्ये वाटप करण्यात येणार आहे.

शरद पवारांना समजून घ्यायला 100 जन्म लागतील : संजय राऊत

महाराष्ट्रात 288 जागांपैकी भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्या होत्या. पक्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिल्याने भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकार आघाडीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे खात्यांचे वाटप होतानाही शिवसेनेला 15, राष्ट्रवादीला 14 आणि काँग्रेसला 13 खाती  देण्यात येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे. तर, विधानसभा अध्यक्ष कोण असेल याची निवड करण्याचे अधिकार शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीकडे दिले आहेत. या पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे. उद्धव ठाकरे लवकरच दिल्ली दौरा करणार असून, या दौऱ्यात त्यांच्या महाशिवआघाडीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिंदगी मे कुछ पाना हो तो... : संजय राऊत

तर, दुसरीकडे संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत सांगितले, की या सरकारचे नेतृत्व शिवसेना करेल. राज्यातील शेतकरी, युवकांची मागणी आहे, की उद्धव ठाकरेंनी नेतृत्व करावे. पूर्ण तयारी करूनच  असे सरकार स्थापन होणार आहे. एका पक्षाचे सरकार नाही, वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन होत आहे. असे सरकार पहिल्यांदाच होत नाही. देशात विविध राज्यांत अशी सरकारे स्थापन झाली आहेत. मोठे राज्य असल्याने वेळ द्यावा लागत आहे. पूर्ण तयारी करून सरकार स्थापन करू. 

हिंमत असेल तर या अंगावर, आम्ही तयार आहोत; शिवसेनेचे थेट आव्हान