esakal | हिंमत असेल तर या अंगावर, आम्ही तयार आहोत; शिवसेनेचे थेट आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena

सारेजण विरोधात गेले असताना मोदी यांचा बचाव करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुखांच्या संघटनेला एनडीएतून बाहेर काढण्याचा मुहूर्त मिळाला. तोदेखील शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीस. स्वतःस हरिश्चंद्राचा अवतार मानणाऱ्यांनी हरिश्चंद्रासारखे वागावे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा आहे. तो अशा मंबाजींना साथ देणार नाही.

हिंमत असेल तर या अंगावर, आम्ही तयार आहोत; शिवसेनेचे थेट आव्हान

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : मोदी यांच्यावर जहरी टीका करणाऱ्या नितीश कुमारांच्या कमरेवर पुन्हा एनडीएचे लंगोट बांधताना तुम्ही आमची परवानगी घेतली होती काय पण सारे जण विरोधात गेले असताना मोदी यांचा बचाव करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या संघटनेस एनडीएतून बाहेर काढण्याचा मुहूर्त मिळाला तोदेखील शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीस स्वतःस हरिश्चंद्राचा अवतार मानणाऱ्यांनी हरिश्चंद्रासारखे वर्तन केले नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी राजांचा आहे अशा मंबाजींना तो साथ देणार नाही. मंबाजींच्या राजकारणाची उलटी गिनती सुरू झाली आहे. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कड्याकपाऱ्यांत फक्त एकच गर्जना घुमेल. शिवसेना झिंदाबाद हिंमत असेल तर या अंगावर आम्ही तयार आहोत, असे म्हणत शिवसेनेने भाजपला थेट लक्ष्य केले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

एनडीतून बाहेर काढल्याने शिवसेनेने संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच मुंबईपासून दिल्लीपर्यंत आक्रमक पवित्रा घेत आंदोलने केली आहेत. आता शिवसेनेने 'सामना' या मुखपत्राच्या अग्रलेखातून भाजपला थेट आव्हान दिले आहे. 

जिंदगी मे कुछ पाना हो तो... : संजय राऊत

शिवसेनेने म्हटले आहे, की सारेजण विरोधात गेले असताना मोदी यांचा बचाव करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुखांच्या संघटनेला एनडीएतून बाहेर काढण्याचा मुहूर्त मिळाला. तोदेखील शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीस. स्वतःस हरिश्चंद्राचा अवतार मानणाऱ्यांनी हरिश्चंद्रासारखे वागावे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा आहे. तो अशा मंबाजींना साथ देणार नाही. आता मंबाजींच्या राजकारणाची उलटी गिनती सुरु झाली आहे. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कड्याकपाऱ्यांत फक्त एकच गर्जना घुमेल ‘शिवसेना जिंदाबाद’. हिंमत असेल, तर या अंगावर. आम्ही तयार आहोत. ज्या वाकडतोंड्याने शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याची घोषणा केली शिवसनेनेचे मर्म आणि एनडीएचे कर्म-धर्म माहीत नाही. तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या घुगऱ्या शिवसेनेने खाल्ल्या आहेत. एनडीएच्या जन्मकळा आणि बाळंतपणाच्या वेदना शिवसेनेने अनुभवल्या आहेत. भाजपच्या वाऱ्यालाही कुणी उभं राहायला तयार नव्हतं. हिंदुत्व, राष्ट्रवाद या शब्दांना देशाच्या राजकारणात कुणी विचारत नव्हतं. तेव्हा आणि त्याआधीही जनसंघाच्या पणतीत तेल ओतण्याचे काम शिवसेनेने केलं. शिवसेनेला बाहेर काढणाऱ्यांनी हा इतिहास समजावून घ्यावा. बरे झाले या कृतीतून तुमच्या विचारांचे गजकर्ण अखेर आज बाहेर पडले. गेले काही दिवस खोटेपणाची खाजवाखाजव सुरू होती. त्यामागचा खरा आजार आता बाहेर पडला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनाचा मुहूर्त या गजकर्ण्यांना सापडला. सारा देश बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करत असतानाच ज्यांनी  एनडीए ची स्थापना केली त्यांनाच घराबाहेर काढण्याची हीन व नीच घोषणा या मंडळींनी केली. साधी चर्चा नाही, चिठ्ठीचपाटी नाही. ज्या  एनडीएचे अस्तित्वच मागच्या साडेपाच वर्षांत पद्धतशीरपणे नष्ट केले त्या एनडीएतून म्हणे शिवसेनेस बाहेर काढले. अहंकारी आणि मनमानी राजकारणाच्या अंताची ही सुरुवात आहे. हे शब्द आम्ही आज येथे जाणीवपूर्वक वापरत आहोत. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राशी घेतलेला हा पंगा तुमचा तंबू उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही.

मराठा आरक्षणाबाबत आज सुनावणी 

loading image
go to top