esakal | मुख्यमंत्री आज पंतप्रधानांना भेटणार
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री आज पंतप्रधानांना भेटणार

 शिवसेना आणि भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर काडीमोड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज (ता. २१) भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्री आज पंतप्रधानांना भेटणार

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली / मुंबई - शिवसेना आणि भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर काडीमोड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज (ता. २१) भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून स्पष्ट करत ''अधिक खोलात जाऊ नये'' अशी पुस्तीही जोडली. मुख्यमंत्री या वेळी काॅँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचीदेखील भेट घेणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाविकास आघाडीमध्ये सीएए, एनआरसी आणि एनपीआरवरून विसंवाद असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ठाकरे मोदींची भेट घेणार आहेत. मात्र ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगत राऊत यांनी यावर अधिक चर्चा होऊ नये याची काळजी घेतली. उद्याच्या पहिल्या भेटीत मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधानांचे राममंदिर ट्रस्ट स्थापन करण्यास प्राधान्य दिल्याबद्दल अभिनंदनही करणार असल्याचे समजते. तसेच देशभरात सीएए, एनआरसी, एनपीआरविषयी राज्य सरकारची भूमिका पंतप्रधानांकडे स्पष्ट करण्याची शक्‍यता आहे. 

सोनियांनाही भेटणार
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या (ता.२१) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत. सोनियांचे आभार मानण्यासाठी उद्धव त्यांना भेटतील, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. तत्पूर्वी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर बोलताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी येऊन भेटावे, अशी सोनिया गांधींची मुळीच अपेक्षा नाही. महाराष्ट्रातील राजकीय अडचणींची त्यांना पूर्ण जाणीव आहे.