राष्ट्रपती वरील टीकेने उदित राज अडचणीत : भाजपकडून माफीनाम्याची मागणी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर चमचेगिरीचा आरोप करणारे ट्विट केल्यामुळे वाद निर्माण
Udit Raj criticism to President Draupadi Murmu
Udit Raj criticism to President Draupadi Murmu

नवी दिल्ली : काँग्रेस नेते उदित राज यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर चमचेगिरीचा आरोप करणारे ट्विट केल्यामुळे वाद निर्माण झाला. आपले म्हणणे व्यक्तिगत स्वरुपाचे असून राष्ट्रपतिपदाशी त्याचा संबंध नाही, अशी सारवासारव उदित राज यांनी केली असली तरी भाजपने यानिमित्ताने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. दरम्यान, वादग्रस्त टिप्पणीवरून राष्ट्रीय महिला आयोगाने उदित राज यांना नोटीसही बजावली आहे.

काँग्रेसच्या असंघटित कामगार विभागाचे प्रमुख माजी खासदार डॉ. उदित राज यांनी काल द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात ट्विट करत म्हटले होते की, ‘द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या राष्ट्रपती कोणत्याही देशाला न मिळो. चमचेगिरीलाही मर्यादा असते. त्या म्हणतात, की ७० टक्के लोक गुजरातचे मीठ खातात. स्वतः मीठ खाऊन जगून पाहावे तेव्हा कळेल.’यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी उदित राज यांच्या ट्विटवरून काँग्रेसच्या माफीनाम्याची मागणी केली. उदित राज यांनी राष्ट्रपतींसाठी वापरलेले शब्द खेदजनक आहे. राष्ट्रपतींबाबत असे काँग्रेसने पहिल्यांदाच केलेले नाही. याआधीही अधीर रंजन चौधरी काय बोलले होते हे सर्वांनी ऐकले होते. हा प्रकार काँग्रेसची आदिवासीविरोधी मानसिकता दर्शविणारा आहे. असे ते म्हणाले.

उदित राज यांची सारवासारव

या घटनाक्रमानंतर उदित राज यांनी सारवासारव करताना राष्ट्रपतींबद्दल आदर असल्याचे स्पष्ट केले. मात्र, आदिवासींच्या प्रश्नावर मौन बाळगले जाणे त्रासदायक असल्याची सूचक टिप्पणी उदित राज यांनी केली. राष्ट्रपती या दलित, आदिवासींच्या प्रतिनिधी असून आपल्या हक्काचे प्रश्न विचारण्याचा या घटकांना अधिकार आहे. त्यामुळे हे राष्ट्रपतिपदाशी जोडले जाऊ नये. द्रौपदी मुर्मूंसाठी आपले वक्तव्य व्यक्तिगत स्वरुपाचे असून ते काँग्रेस पक्षाचे वक्तव्य नाही, असे उदित राज म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com