Video : राष्ट्रवादीत 15 वर्षांत फक्त अडवा आणि जिरवा : उदयनराजे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 September 2019

मुख्यमंत्र्यांशी माझी जुनी मैत्री आहे. आम्ही पहिल्यापासून एक आहोत. त्यांच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे झाली आहेत. केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्याचा फायदा होतो.

नवी दिल्ली : भाजपमध्ये प्रवेश केल्याने किमात आता कामे तरी होतील. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना गेली 15 वर्षे फक्त अडवा आणि जिरवा हीच कामे झाली, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज (शनिवार) अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रामदास आठवले आदी नेत उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, की मुख्यमंत्र्यांशी माझी जुनी मैत्री आहे. आम्ही पहिल्यापासून एक आहोत. त्यांच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे झाली आहेत. केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्याचा फायदा होतो. कोणाबद्दल मी कधीच वाईट बोलणार नाही. आम्ही दिलेल्या फायली आधी कचऱ्याच्या डब्यात जात होत्या. पण, आता तसे होणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udyanraje Bhosale reaction after enters BJP