CM Mohan Yadav Son Wedding: 'एकाच मंडपात मुख्यमंत्र्यांचा मुलगा आणि ड्रायव्हरचंही लग्न', बैलगाडीतून लग्नाला पोहोचले अभिमन्यू
CM’s Son Marries in Mass Wedding Ceremony in Ujjain: मध्य प्रदेश सीएम मोहन यादव यांच्या मुलगा अभिमन्यू यादव याचे सामूहिक विवाहात साधेपणाने लग्न; बैलगाडीतून वरात काढून अनोखा संदेश. ड्रायव्हरच्या मुलासह एकाच मंडपात फेरे घेतल्याने समानता, साधेपणा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देशभर चर्चेत.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचे धाकटे पुत्र अभिमन्यु यादव यांनी रविवारी (३० नोव्हेंबर) उज्जैन येथे आयोजित एका सामूहिक विवाह समारंभात डॉ. इशिता यादव यांच्याशी विवाह केला.