Ujjain Mosque Demolition
esakal
Ujjain Mosque Demolition : मध्य प्रदेशातील उज्जैन येथील तकिया मशीद पाडण्याच्या प्रकरणाने आता सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) दरवाजे ठोठावले आहे. उज्जैन येथील मशीद पाडण्याचा निर्णय कायम ठेवणाऱ्या मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत, मशिदीत नमाज पडणाऱ्या १३ स्थानिक रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.