

Madhya Pradesh CM Honours Ujjain Sanitation Workers With Flower Shower and Announces 5000 Rupees for Each Worker
esakal
उज्जैन शहरातील तीन हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्यात येणार असल्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केली. मंगळवारी उज्जैनमधील गीता भवन येथे आयोजित ‘स्वच्छता मित्र सन्मान सोहळ्या’त ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सफाई कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले आणि शहराच्या स्वच्छतेत त्यांच्या योगदानाचा गौरव केला.