''भारतात आल्यावर 'बच्चन' झाल्यासारखा फिल येतोय'' | Boris Johnson | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''भारतात आल्यावर 'बच्चन' झाल्यासारखा फिल येतोय''

''भारतात आल्यावर 'बच्चन' झाल्यासारखा फिल येतोय''

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) सध्या भारत दौऱ्यावर असून, आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भट घेत चर्चा केली. यावेळी जॉन्सन यांनी भारताने केलेल्या त्यांच्या भव्य स्वागताबद्दल आभार मानले. जॉन्सन यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागताचे होर्डिंग्स लावण्यात आले आहे. हे पाहून भावनिक झालेल्या जॉन्सन यांनी होर्डिंग्स पाहून आपल्याला सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन असल्याचा फील येत आहे, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख खास दोस्त असा करत, दोन्ही देशांमध्ये खास संबंध असल्याचेही म्हंटले आहे.

भेटीदरम्यान, जॉन्सन आणि मोदी यांच्यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली असून, भारत आणि ब्रिटन देशांमध्ये मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement) लवकरात लवकर पूर्ण करण्याचे मान्य केले असून, हा करार येत्या दिवाळीपर्यंत अस्तित्त्वात येण्याचा अंदाज जॉन्सन यांनी वर्तवला आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारत आणि ब्रिटन यांच्यात मुक्त व्यापार कराराची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. (UK PM Boris Johnson India Tour)

हेही वाचा: मोठी बातमी! मुख्यमंत्री सोरेन यांच्या मालमत्तेची ईडीव्दारे होणार चौकशी

जॉन्सन म्हणाले की, भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करारामुळे 2035 पर्यंत ब्रिटनचा एकूण व्यापार 28 अब्ज पौंड होईल आणि युक्रेनमधील उत्पन्न 3 अब्ज पौंडांनी वाढेल. नोकरशाही कमी करण्यासाठी आणि संरक्षण खरेदीमध्ये वितरणाचा कालावधी कमी करण्यासाठी यूके भारतावर लक्ष केंद्रित करून एक सामान्य निर्यात परवाना तयार करत आहे. तर, दुसरीकडे इंडो-पॅसिफिकमध्ये नवीन लढाऊ जेट तंत्रज्ञान, हेलिकॉप्टर आणि पाण्याखालील युद्धक्षेत्रात सहकार्यासह सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी ब्रिटन भारतासोबत सहयोग करेल असे ब्रिटीश उच्चायुक्तालयाच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा: फक्त 2599 रुपयांत खरेदी करा स्मार्टफोन, जिंका खास ऑफर्स!

प्रसारमाध्यमांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, भारत स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना, ब्रिटिश पंतप्रधानांची भारत भेट ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. बैठकीदरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये मुक्त व्यापार करार, ग्लासगो क्लाइमेट कमिटमेंट आणि "मुक्त आणि खुले" हिंद-प्रशांत महासागर आदी विषयांवर सखोल चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Uk Pm Boris Johnson Pm Modi Joint Address Says Free Trade Agreement By Diwali

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..