CoronaVirus : युकेनंतर आता दक्षिण अफ्रिका आणि ब्राझिलचाही स्ट्रेन भारतात दाखल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

युकेमध्ये आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतात दाखल झाला होता. त्यानंतर आता दक्षिण अफ्रिका आणि ब्राझिलमध्ये आढळून आलेल्या नव्या विषाणूचीही भारतात एन्ट्री झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी आपल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

नवी दिल्ली - युकेमध्ये आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतात दाखल झाला होता. त्यानंतर आता दक्षिण अफ्रिका आणि ब्राझिलमध्ये आढळून आलेल्या नव्या विषाणूचीही भारतात एन्ट्री झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी आपल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, युकेमध्ये आढलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचे देशात आजपर्यंत एकूण 187 बाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच इतर दोन देशांमध्ये आढळून आलेल्या विषाणूचे बाधित लोकही आढळून आले आहेत. दक्षिण अफ्रिकेतून भारतात परतणाऱ्या चार लोकांमध्ये हा नवा विषाणू आढळून आला आहे. तर ब्राझिलवरुन आलेल्या एकामध्ये विषाणू आढळून आला आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळेला नवा विषाणू अमेरिकेसह जगातील 41 देशांमध्ये पसरला आहे. तर युकेचा विषाणू हा जगभरातील 82 देशांमध्ये पसरला आहे. तसेच ब्राझिलमध्ये आढळून आलेला नवा विषाणू 9 देशांमध्ये आढळून आला आहे. 

पावरी सोडा, हे बघा! पाकिस्तानी मुलीच्या पार्टी व्हिडिओवर स्मृती इराणींची प्रतिक्रिया

दक्षिण अफ्रिकेत आढळलेला विषाणू
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी पत्रकार परिषेदत सांगितलं की, देशात जानेवारी 2021मध्ये दक्षिण अफ्रिकेतून परतलेल्या चार प्रवाशांमध्ये दक्षिण अफ्रिकेतील विषाणूची पुष्टी झाली आहे. त्यामुळे या सर्व प्रवाशांना आयसोलेट करण्यात आलं आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या चाचण्या करुन क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दक्षिण अफ्रिकेत डिसेंबर महिन्याच्या मध्यात हा विषाणू आढळून आला होता. दक्षिण अफ्रिकेत सर्वाधिक बाधित रुग्ण हे याच विषाणूचे आढळून आले आहेत. विषाणूचं हे रुप आजवर 44 देशांत पसरलं आहे. 

ब्राझिलमध्ये आढळलेला विषाणू
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ब्राझिलवरुन भारतात परतणाऱ्या एका व्यक्तीमध्ये हा विषाणू आढळून आला होता. या व्यक्तीला आयसोलेट करण्यात आलं होतं तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांच्या चाचण्या करुन त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. हा विषाणू 15 देशांमध्ये पसरला आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UK South Africa and Brazil corona virus strain enters in india