भारताने भ्रमात राहू नये, गेल्या वर्षी 2.40 लाखांहून अधिक मृत्यू | UN | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus

गेल्या वर्षी 2.40 लाखांहून अधिक मृत्यू, भारताने भ्रमात राहू नये- UN

कोरोनाचा (corona) नवीन प्रकार ओमिक्रॉनच्या (omicron) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत (india) पुन्हा एकदा त्याच धोक्याकडे वाटचाल करत आहे, जो गेल्या वर्षी दिसला होता. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्राने (united nation) भारतासाठी इशारा दिला आहे.

भारताने भ्रमात राहू नये- UN

अहवालात म्हटले आहे की, भारतात गेल्या वर्षी एप्रिल-जूनमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्रकारामुळे २,४०,००० लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकाराचा आर्थिक परिस्थितीवरही परिणाम झाला. पुन्हा तीच परिस्थिती भारतात निर्माण होत आहे. त्यामुळे भ्रमात राहण्याची गरज नाही.

'ग्लोबल इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स' (WESP) फ्लॅगशिप रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या अतिसंक्रामक ओमिक्रॉन स्वरूपामुळे संसर्गाची नवीन लाट सुरू झाली आहे. त्यामुळे या साथीचा पुन्हा एकदा आर्थिक परिस्थिती आणि मानवांवर परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा: देशात 24 तासात 2.64 लाख नवे रुग्ण; 315 जणांचा मृत्यू

...तर महामारीचा सामना करणे अशक्य

जागतिक सहकार्याशिवाय महामारीचा सामना करणे अशक्य आहे. युनायटेड नेशन्सचे आर्थिक आणि सामाजिक प्रकरणांचे अंडर-सेक्रेटरी जनरल लिऊ झेनमिन म्हणाले की, जागतिक सहकार्याशिवाय कोविड-19 चा सामना करणे शक्य नाही. जोपर्यंत ही लस सर्वांपर्यंत पोहोचत नाही. तोपर्यंत हा सर्वात मोठा धोका राहील. भारतातील आरोग्य मंत्रालयाच्या मते, आतापर्यंत 1546 दशलक्षाहून अधिक लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभर हाहाकार माजवला होता

हेही वाचा: 'अशा घटनांना विरोध झालाच पाहिजे'; किरण मानेंच्या समर्थनार्थ उतरले नेटकरी

अमेरिकेत ओमिक्रॉन प्रकाराने उग्र रूप धारण केले असतानाच संयुक्त राष्ट्राचा हा अहवाल समोर आला आहे. परिस्थिती अशी झाली आहे की अनेक राज्यांमध्ये वैद्यकीय पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडल्या आहेत आणि व्हाईट हाऊसला अनेक प्रांतांत सैन्य मागे घ्यावे लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी गेल्या 24 तासांत 1,42,388 रुग्णांना अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परिस्थिती अनियंत्रित पाहून राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी मिशिगन, न्यू जर्सी, न्यू मेक्सिको, न्यूयॉर्क, ओहायो आणि रॉड आयलंड येथील रुग्णालयांच्या मदतीसाठी सैन्य पाठवले

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top