esakal | विद्यार्थ्यांना AK-47 हाती घेण्यासाठी भडकावणारा शिक्षक; UnAcademy दिलं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

varun avasthi

एक शिक्षक विद्यार्थ्यी हातातला पेन सोडून AK- 47 घेतील असं सांगत असल्याचं दिसत आहे. अनअकॅडमी या कोचिंग सेंटरमधील शिक्षक वरुण अवस्थी यांचा हा व्हिडिओ आहे.

विद्यार्थ्यांना AK-47 हाती घेण्यासाठी भडकावणारा शिक्षक; UnAcademy दिलं स्पष्टीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात एक शिक्षक विद्यार्थ्यी हातातला पेन सोडून एके 47 घेतील असं सांगत असल्याचं दिसत आहे. अनअकॅडमी या कोचिंग सेंटरमधील शिक्षक वरुण अवस्थी यांचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अवस्थी यांनी तो फेसबुकवरून हटवला. मात्र अनेक ठिकाणी तो आधीच व्हायरल झाला होता. यामध्ये विद्यार्थ्यांना शस्त्रे हातात घेण्यासाठी भडकावण्याचा प्रयत्न शिक्षक करत असल्याचं दिसतं. 

वरुण अवस्थी यांचा हा व्हिडिओ एसएससी रेल्वे परीक्षेच्या निकालात होत असलेल्या दिरंगाईबाबत तयार करण्यात आला होता. ज्यावेळी हा व्हिडिओ टॅगद्वारे शोधण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. हा व्हिडिओ अनेक कोचिंग सेंटरच्या शिक्षकांनी शेअर केला होता. दरम्यान, अनअकॅडमीने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

अनअकॅडमीने काही ट्विट करून उत्तरे दिली आहेत. त्यांनी म्हटलं की, कंपनी शिक्षकांकडून होणाऱ्या अशा कृत्यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही. या प्रकरणाी चौकशी करण्यात येत असून योग्य ती कारवाई करण्यात येईल. 


याआधीही अनअकॅडमीच्या शिक्षकाने विशिष्ट जातीला टार्गेट करत पोस्ट केली होती. शिक्षकांकडून तयार करण्यात आलेल्या अशा व्हिडिओंची गोष्ट एवढ्यापुरतीच मर्यादीत नाही.

राजस्थानी रिंगर, एज्युकेशन अफेअर्स यासारक्या कोचिंग सेंटरद्वारे असेच काही व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झाले आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार कऱण्याऐवजी भलत्याच गोष्टी त्यांच्या डोक्यात भरवल्या जात असल्याचं निदर्शनास आलं आहे.