दिवाळीत तेल परवडेना; गरीबांची आयोध्येच्या दीपोत्सवात उडाली झुंबड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीत तेल परवडेना; गरीबांची आयोध्येच्या दीपोत्सवात उडाली झुंबड

दिवाळीत तेल परवडेना; गरीबांची आयोध्येच्या दीपोत्सवात उडाली झुंबड

अयोध्येत 23 ऑक्टोबरला राम मंदिराच्या पायऱ्यांवर 15 लाख 76 हजार दिवे प्रज्वलित करून नवा विश्वविक्रम रचला होता. यासोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. हा सोहळापार पडल्यानंतर दिवे विझताच दिव्यातील तेल मिळवण्याची स्पर्धा लागल्या सारखी लोकांची गर्दी उसळली.

जवळपास राहणारे गरीब वर्गातील लोक दिव्यातील जळलेलं मोहरीचं तेल गोळा करताना पाहिला मिळाले. दीपोत्सवात 15 लाखाहून अधिक दिव्यांमध्ये 60 हजार लिटर मोहरीचे तेल भरण्यात आले. 37 घाटांवर लावलेले दिवे विझल्यानंतर लोक डब्बे घेऊन तेल लुटण्यासाठी पोहोचले. तेथील एका व्यक्तीला विचार असता तो म्हणाला "मोहरीचे तेल 200 रुपये लिटर असून ते येथे मोफत मिळत आहे. त्यामुळे घेत घेवून जात आहे. आणि या तेलाने आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत"

तेल गोळा करण्यासाठी लहान मुले, महिला, युवक, वृद्ध, हे सर्वजण तेल गोळा करताना दिसत होते. हे लोक तासनतास दिव्यांतून तेल गोळा करून ते बाटली, भांडी, डब्बामध्ये या गोळा करत होते. या सर्वांमध्ये तेल गोळा करण्याची स्पर्धाच लागली होती त्यांच्या मनात भिती होती की पोलीस येतील आणि तेल गोळा करून देणार नाहीत.